Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2 Highlights Match Today : गुजरातचे सलामीचे फलंदाज शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहाने अप्रतिम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी सावध खेळी केल्याने मुंबईला विकेट मिळाली नाही. परंतु, त्यानंतर सहाव्या षटकात पीयुष चावलाने ऋद्धीमान साहाला १८ धावांवर बाद केलं. मात्र, त्यानंतर शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत आयपीएल २०२३ मध्ये तिसरं शतकं ठोकलं. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर १२९ धावांची वादळी शतकी केली. तसंच साई सुदर्शननेही जबरदस्त फलंदाजी करत ४३ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारही. त्यामुळे मुंबईला विजयासाठी २० षटकात २३४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

Live Updates

Qualifier 2, MI vs GT Highlights Match Updates

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर २ सामन्याची जोरदार लढत होणार आहे.

23:44 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live: मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार-विनोद बाद, डेव्हडलाही पाठवलं तंबूत

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने अप्रतिम फलंदाजी करून वादळी अर्धशतक ठोकलं. सूर्यकुमारने ३८ चेंडूत ६१ धावा कुटल्या. परंतु, मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सूर्या बाद झाला. त्यानंतर लगेच विष्णू विनोद बाद झाला अन् मुंबईला इंडियन्सला मोठा धक्का बसला. १५ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १५८-६ अशी झाली होती. त्यानंतर राशिद खानने टीम डेव्हिडला २ धावांवर बाद केलं. मुंबईची धावसंख्या १५८-७ अशी झाली आहे. त्यानंतर मोहित शर्माने जॉर्डन आणि चावलाला बाद केलं. त्यामुळे मुंबईची धावसंख्या १६२-९ अशी झाली आहे.

23:12 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live: सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा ठोकलं अर्धशतक, मुंबई : 149-4

मुंबईचे धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीनने तीन फलंदाज बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्सची कमान सांभाळली आहे. दोन्ही फलंदाज सावध खेळी करून मुंबईची धावसंख्या वाढवत आहेत. अकरा षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२३-३ अशी झाली आहे. जोश लिटिलच्या गोलंदाजीवर कॅमरून ग्रीन ३० धावांवर बाद झाला. त्यामुळे १२ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२८-४ अशी झाली आहे. तेरा षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३४-४ अशी झालीय. चौदा षटकानंंतर मुंबईची धावसंख्या १४९-४ झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1662146740521431041?s=20

22:52 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : मैदानात चौकार षटकारांचा पाऊस पाडून तिलक वर्मा झाला बाद, MI : 95-3

रोहित शर्मा आणि नेहल वढेरा स्वस्तात माघारी परतल्यानंतर तिलक वर्माने मोहम्मद शमीची धुलाई केली. पाचव्या षटकात चौकार षटकारांचा पाऊस पाडत तिलक वर्माने २४ धावा कुटल्या. मात्र, राशिद खानच्या सहाव्या षटकात तिलक वर्मा ४३ धावांवर असताना क्लिन बोल्ड झाला आणि मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला. सात षटकानंतर मुंबईची धावसंख्या ७७-३ अशी झाली आहे. आठ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ८४-३ अशी झाली आहे. ९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ९५-३ अशी झाली आहे,

https://twitter.com/IPL/status/1662146740521431041?s=20

22:35 (IST) 26 May 2023
मुंबई इंडियन्सची दाणादाण, पॉवर प्लेमध्ये दोन फलंदाज बाद, MI : 41 -2

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला २३४ धावांचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या नेहल वढेरा आणि कर्णधार रोहित शर्माला बाद करण्यात गुजरात टायटन्सला यश आलं. मोहम्मद शमीनं या दोन्ही फलंदाजांना बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला. त्यामुळे तीन षटकानंतर मुंबईची धावसंख्या २९-२ अशी झाली आहे. चार षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४१-२ अशी झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1662138938570719232?s=20

22:13 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : नेहल वढेरा स्वस्तात माघारी, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

गुजरात टायटन्सने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी २३४ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहेत. मुंबई इंडियन्ससाठी सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि नेहल वढेरा मैदानात उतरले होते. परंतु, मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर नेहल वढेरा ४ धावांवर बाद झाला. त्यामुळे एका षटकानंतर मुंबईची धावसंख्या १७-१ अशी झालीय.

https://twitter.com/IPL/status/1662134177888890880?s=20

21:59 (IST) 26 May 2023
गुजरातच्या शुबमन गिलचं वादळी शतक! मुंबईसाठी विजयासाठी २३४ धावांचं तगडं आव्हान

गुजरातचे सलामीचे फलंदाज शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहाने अप्रतिम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी सावध खेळी केल्याने मुंबईला विकेट मिळाली नाही. परंतु, त्यानंतर सहाव्या षटकात पीयुष चावलाने ऋद्धीमान साहाला १८ धावांवर बाद केलं. मात्र, त्यानंतर शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत आयपीएल २०२३ मध्ये तिसरं शतकं ठोकलं. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर १२९ धावांची वादळी शतकी केली. तसंच साई सुदर्शननेही जबरदस्त फलंदाजी करत ४३ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारही. त्यामुळे मुंबईला विजयासाठी २० षटकात २३४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1662133162766659585?s=20

21:20 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : दमदार शतक ठोकून शुबमन गिल बाद, GI : २१३-२

गुजरात टायटन्सचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टडियममध्ये षटकारांचा पाऊस पाडत आयपीएल २०२३ मधील तिसरं शतक ठोकलं आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत शुबमन चौकार षटकारांचा पाऊस पाडत आहे. त्यामुळे गुजरातची धावसंख्या १७ षटकानंतर १८३-१ अशी झाली आहे. सतराव्या षटकात आकाश मधवालने शुबमनला १२९ धावांवर बाद केलं. त्यामुळे गुजरातची धावसंख्या १९८-२ अशी झाली आहे. अठरा षटकानंतर २१३-२ वर गुजरातची धावसंख्या पोहोचली आहे.

https://twitter.com/IPL/status/1662122847714828288?s=20

20:53 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live :नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शुबमन गिलची चौफेर फटकेबाजी, GT, 147-1

गुजरात टायटन्सचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलने पुन्हा एकदा अर्धशतकाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत शुबमनने अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे बारा षटकानंतर गुजरातची धावसंख्या ११९-१ अशी झाली आहे. चौदा षटकानंतर गुजरातची धावसंख्या १४७-१ अशी झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1662117060695179264?s=20

20:30 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : पीयुष चावलाने ऋद्धीमान साहाला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, गुजरात, ८०-१

गुजरातचे सलामीचे फलंदाज शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहाने अप्रतिम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी सावध खेळी केल्याने मुंबईला विकेट मिळाली नाही. त्यामुळे सहा षटकानंतर गुजरातची धावसंख्या बिनबाद ५० झाली होती. त्यानंतर सातव्या षटकात पीयुष चावलाने साहाला १८ धावांवर बाद करून गुजरातला पहिला धक्का दिला, आठ षटकानंतर गुजरातची धावसंख्या ६४-१ अशी झाली आहे. ९ षटकानंतर गुजरातची धावसंख्या ८०-१ झालीय.

https://twitter.com/IPL/status/1662107583480750081?s=20

20:01 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहा फलंदाजीसाठी उरतले मैदानात, GT : २७-०

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गुजरात टायटन्सचे सलामीचे फलंदाज शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहा मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. चार षटकानंतर गुजरातची धावसंख्या २७-० अशी झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1662104095711436812?s=20

19:51 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : गुजरात टायटन्सविरोधात नाणेफेक जिंकून MI चा गोलंदाजीचा निर्णय

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात गुजरातचे फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उतरणार आहेत.

https://twitter.com/IPL/status/1662096856586022912?s=20

19:05 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कोसळल्या पावसाच्या सरी, नाणेफेक उशिराने

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर २ चा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. हजारोंच्या संख्येत प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित झाले आहेत. तत्पूर्वी सामन्याआधीच पावसाने व्यत्यय घातला. पाऊस पडल्याने नाणेफेक उशिराने होणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1662077651656519680?s=20

17:42 (IST) 26 May 2023
GT vs MI Qualifier 2 Live : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स आमनेसामने

आयपीएल २०२३ चा क्वालिफायर २ चा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव केल्यास मुंबईला आयपीएलचा किताब सहाव्यांदा जिंकण्याची संधी उपलब्ध होईल. पण हा सामना गुजरातने जिंकल्याच चेन्नईविरोधात फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर आयपीएलच्या इतिहासात एका नव्या विक्रमाची नोंद केली जाईल. पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे गुजरात आणि मुंबईत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या आमनेसामने येणार असल्याने आजचा हा रंगतदार सामना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

https://twitter.com/IPL/status/1662063042677592064?s=20

https://twitter.com/IPL/status/1662043508428144641?s=20

GT vs MI Qualifier 2 Live Updates

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स क्वालिफायर २ लाइव्ह स्कोअर

Qualifier 2, MI vs GT Highlights Match Updates

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रोहित शर्मा-हार्दिक पांड्या आमनेसामने, IPL २०२३ च्या फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ सज्ज