IPL 2023, Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीग २०२३च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आज (२६ मे) आमनेसामने असतील. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो किंवा मरो’ असा आहे. सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. हा सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याकडे सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याकडे लक्ष असेल. त्याचवेळी रोहित शर्मा मुंबईसाठी आयपीएलचे सहावे विजेतेपद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील या सामन्यात गुजरात टायटन्सचा राशिद खान मुंबई इंडियन्ससाठी धोका ठरू शकतो. आयपीएल २०२३ मध्ये राशिद फलंदाजीत यशस्वी ठरला आहे.

यंदाच्या मोसमात दोघांमध्ये बरोबरी साधली गेली आहे. दोघांनीही प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी आहे. या सामन्यात जगातील दोन सर्वोत्तम खेळाडू आमनेसामने असतील. एकीकडे टी२० चा नंबर १ गोलंदाज असेल तर दुसरीकडे टी२० मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज उपस्थित असेल.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IPL 2025 Mega Auction Most Expensive Foreigner Player
IPL 2025 : जोस बटलर किंवा मिचेल स्टार्क नव्हे तर… दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ युवा अष्टपैलू ठरु शकतो सर्वात महागडा परदेशी खेळाडू
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

मुंबई इंडियन्ससमोर ‘त्या’१२ षटकांचे आव्हान

मुंबई आणि गुजरात यांच्यातील मागील दोन्ही सामन्यांवर नजर टाकली तर एमआय पलटणचा खरा सामना फक्त १२ षटकांचा आहे. या १२ षटकांमध्ये जर रोहितच्या फलंदाजांनी हल्लाबोल करत धावा केल्या तर गुजरातची अवस्था कठीण होऊन बसेल, अन्यथा ही मुंबईच्या डावाची १२ षटके त्यांच्या पराभवाची कहाणी ठरू शकतात. क्वालिफायर २ मध्ये मुंबईसाठी महत्त्वाची १२ षटके म्हणजे मोहम्मद शमी, राशिद खान आणि नूर अहमद या तिघांची ४-४ षटके आहेत. हे तिन्ही गोलंदाज रोहितच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

हेही वाचा: PM Modi: “आधीच्या सरकारांसाठी खेळ म्हणजे घोटाळा”, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

राशिद खानसमोर सूर्यकुमार असेल आव्हान

टी२० चा नंबर वन बॉल राशिद खानचा या मोसमात मुंबईविरुद्ध उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. अहमदाबाद येथे झालेल्या साखळी सामन्यात राशिदने इशान किशन आणि तिलक वर्माला बाद केले. त्याचवेळी वानखेडेवर रोहित शर्मा, इशान किशन, नेहल वढेरा आणि टीम डेव्हिड यांनी विकेट घेतल्या. राशिदसमोर रोहित शर्माची बॅट शांत राहते. राशिदने ६ डावात ४ वेळा रोहित शर्माला बाद केले आहे.

जगातील नंबर १ टी२० फलंदाज सूर्यकुमारबद्दल बोलायचे झाले, तर त्याने राशिदच्या ४७ चेंडूत ९ डावात आउट न होता ६७ धावा केल्या आहेत. तर, नूर अहमदविरुद्ध, सूर्याने २ डावात १३ चेंडू खेळले आहेत आणि एकदा तो बाद झाला आहे. अशा स्थितीत सूर्या आणि राशिद यांच्यात जबरदस्त लढत होण्याची शक्यता आहे. तसेच, होम अॅडव्हान्टेजचा फायदा असं विचार केल्यास गुजरातचा वरचष्मा दिसत आहे. कारण, राशिद खान आणि नूर अहमद यांनी फिरकी साथ न देणाऱ्या खेळपट्ट्यांवरही प्रभाव पाडण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा: GT vs MI Qualifier 2: रोहित-राशिदमध्ये रंगणार रोमांचक मुकाबला, ‘मिस्टर ३६०’च्या विरुद्ध करामती खान कोणती योजना आखणार? जाणून घ्या

मोहम्मद शमीने १५ सामन्यात १७.३८च्या सरासरीने सर्वाधिक २६ विकेट्स घेतल्या असून सध्या त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. फिरकीपटू राशिद खान पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने १९च्या सरासरीने २५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर नूर अहमदने ११ सामन्यात १४ विकेट्स काढल्या. हे तिघेही मुंबई इंडियन्ससाठी जास्त धोकादायक ठरू शकतात, त्यांच्या या आकड्यांवरून लगेच लक्षात येते. त्यातही विकेट्स सोबतच ते कसून गोलंदाजी करतात. अशा परिस्थितीत पलटणचा खरा सामना गुजरातच्या या १२ षटकांतच ठरणार आहे.