Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2 Match Today: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी (२६ मे) आयपीएलचा दुसरा क्वालिफायर खेळला जात आहे. या सामन्यात पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना गतविजेता गुजरात टायटन्ससमोर आहे. पावसामुळे टॉसला ४५ मिनिटे उशीर झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलने तुफानी शतक झळकावले. सध्या सुरु असलेल्या हंगामात त्याचे हे तिसरे शतक आहे.

शुबमन गिलच्या बॅटने यावर्षी सातत्याने धावा काढल्या आहेत आणि आयपीएल २०२३च्या मोसमात त्याने सर्व फलंदाजांना मागे टाकले आहे. गुजरात टायटन्सच्या युवा सलामीवीराने क्वालिफायर-२ मध्येही मुंबई इंडियन्सविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट शतक झळकावले. गिलचे या मोसमातील हे तिसरे शतक आहे. या डावात त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीचे योगदान जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्याला साथ देणाऱ्या मुंबईच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचे देखील आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात संघाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. पावसामुळे सामना अर्धा तास उशिराने सुरू झाला आणि अशा स्थितीत प्रथम फलंदाजी करताना गुजरातला मुंबईच्या वेगवान गोलंदाजांसमोर अडचणीचा सामना करावा लागेल, असे वाटत होते. असे घडले नाही आणि त्याचे कारण होते शुबमन गिल, ज्याने पुन्हा गोलंदाजांची कोंडी केली.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

मुंबईने केलेली एक चूक पडणार महागात

या मोसमात ७०० हून अधिक धावा करणाऱ्या गिलने या सामन्यातही चांगली सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर सहाव्या षटकात ख्रिस जॉर्डन गोलंदाजीला आला आणि गिलने सुरुवातीलाच एक षटकार आणि एक चौकार लगावला. जॉर्डनने अशी सुरुवात करून संधी निर्माण केली. मिडऑनला गिलने ओव्हरचा पाचवा चेंडू मारला. तिथे तैनात असलेल्या टीम डेव्हिडला कॅच घेण्याची संधी होती पण डेव्हिडने उजवीकडे डायव्हिंग करूनही ही संधी सोडली. त्याच्या हातातून चेंडू बाहेर आला. त्यावेळी गिलची धावसंख्या २० चेंडूत केवळ ३० धावा केल्या होत्या. शेवटी त्याच डेव्हिडने मधवालच्या गोलंदाजीवर झेल पकडला. ६० चेंडूत १२९ धावा केल्या. त्याच्या अफलातून, अविश्वसनीय खेळीत १० उत्तुंग षटकार आणि ७ चौकार मारत २१५च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावले.

या डावात ९ धावा करताच शुबमन गिलने ऑरेंज कॅपवरही आपली दावेदारी सांगितली आहे. त्याच वेळी, त्याच्या नावावर ८००च्या वर धावा झाल्या आहेत आणि या खेळाडूने ऑरेंज कॅप जवळजवळ निश्चित केली आहे. प्लेऑफमध्ये उपस्थित असलेला एकही खेळाडू त्याच्या आसपास नाही. गिलने यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ५८ चेंडूत १०१ आणि आरसीबीविरुद्ध ५२ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. यासोबतच आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक ठोकणारा गिल सातवा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी मुरली विजय, वीरेंद्र सेहवाग, जोस बटलर, वृद्धिमान साहा, रजत पाटीदार आणि शेन वॉटसन यांनी अशी कामगिरी केली होती.

यापूर्वी ख्रिस गेल (२०११), हाशिम आमला (२०१७), शिखर धवन (२०२०), शेन वॉटसन (२०१८), के.एल. राहुल (२०२२) आणि विराट कोहली (२०२३) यांच्या नावावर एकाच आयपीएल हंगामात दोन शतके झळकावण्याचा विक्रम होता. केले होते पण आता शुबमन गिलने या सर्वांना मागे टाकले आहे. या मोसमातील शतकांबद्दल बोलायचे झाले तर हे १२वे शतक समोर आले आहे. त्यापैकी तीन शतके गिलने तर दोन शतके विराट कोहलीने झळकावली.

हेही वाचा: IPL2023, MS Dhoni: “खेळाचा अनादर करणाऱ्यांना आपण कायद्यापेक्षा…”, अंपायर डॅरिल हार्परची एम.एस. धोनीला सणसणीत चपराक

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू

विराट कोहली – ४ शतके (२०१६)
जोस बटलर – ४ शतके (२०२२)
शुबमन गिल – ३ शतके (२०२३)*