Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL Match 23: आयपीएलच्या २३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ गतविजेत्या गुजरात टायटन्ससमोर आहे. दोघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. राजस्थानला विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्या मैदानावर ही धावसंख्या खूप कमी असून दवाचा किती परिमाण होतो हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने केवळ १७७ धावा केल्या. गुजरातकडून डेव्हिड मिलर (४६) आणि शुबमन गिल (४५) यांनी सर्वाधिक धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने 2, बोल्ट, जम्पा आणि चहलने एक-एक बळी घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने पॉवरप्लेमध्ये २ गडी गमावून ४२ धावा केल्या. साहा (४) आणि सुदर्शन (२०) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार हार्दिक पांड्या १९ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. सलामीवीर शुबमन गिल ३४ चेंडूत ४५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

गुजरात टायटन्सबद्दल बोलायचे झाले तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक सामन्यात एक नवा मॅच विनर उदयास येतो आणि सामना जिंकतो. अखेरच्या सामन्यात राहुल तेवतियाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला. शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि रशीद खान यांनी वेळोवेळी विकेट घेण्यात यश मिळवले आहे. मात्र, डेव्हिड मिलरची कामगिरी अजून पाहिली जात नाही.

दुसरीकडे राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर, जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येक सामन्यात संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यापासून अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनचा फॉर्म हा राजस्थानसाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल आणि अनुभवी आर अश्विन हे त्रिकूट आहे.

हेही वाचा: MI vs KKR: …भाऊराया! स्विंगवर अर्जुन तेंडुलकरने फलंदाजाला चकवले, बहीण सारा तेंडुलकर झाली भावूक, Video व्हायरल

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c/wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स: वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा.