Gujarat Titans defeated Sunrisers Hyderabad : आयपीएलच्या १७व्या हंगामातील १२वा सामना रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझ्रर्स हैदराबाद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने सनरायझ्रर्स हैदराबाद ७ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने गुजरातसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने ३ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ८ गडी गमावून १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९१. षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने विजयी षटकार मारला. त्याने २०व्या षटकात जयदेव उनाडकटच्या पहिल्या चेंडूवर त्याने लाँग ऑफवर गगनचुंबी षटकार मारला. गुजरातकडून साई सुदर्शनने ४५ आणि डेव्हिड मिलरने नाबाद ४४ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर गोलंदाजीत मोहित शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

India Beat England by 150 Runs in 5th T20I Abhishek Sharma Century Mohammed Shami 3 Wickets
IND vs ENG: एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

१६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला चांगली सुरुवात मिळाली. कर्णधार शुबमन गिल आणि साहा यांनी पहिल्या विकेटसाठी ३६ (२५ चेंडू) धावांची भागीदारी केली. संघाला पहिला धक्का पाचव्या षटकात साहाच्या रूपाने बसला, ज्याने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. त्यानंतर २८ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २६ धावा करून १०व्या षटकात कर्णधार शुबमन गिलच्या पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा – उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी

कर्णधाराच्या विकेटनंतर डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन यांनी जबाबदारी स्वीकारली आणि दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची (४२ चेंडू) भागीदारी केली. ही भरभराटीची भागीदारी १७व्या षटकात साई सुदर्शनच्या विकेटसह संपुष्टात आली. सुदर्शनने ४५ धावांची खेळी केली. त्यानंतर डेव्हिड मिलरने विजय शंकरसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद ३० (१८ चेंडू) अशी अखंड भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मिलरने २७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४४ तर विजय शंकरने ११ चेंडूत २ चौकारांसह नाबाद १४ धावा केल्या. हैदराबादकडून शाहबाज अहमद, मयंक मार्कंडे आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर १७ चेंडूत १६ धावा करून मयंक अग्रवाल बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडला नूर अहमदने क्लीन बोल्ड केले. त्याला १४ चेंडूत १९ धावा करता आल्या. अभिषेक शर्माला मोहित शर्माने शुबमनच्या हाती झेलबाद केले. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. एडन मार्करम १९ चेंडूत १७ धावा करून बाद झाला, तर हेनरिक क्लासेन १३ चेंडूत २४ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – Mayank Yadav : ‘… कुठे लपला होतास’, माजी दिग्गज डेल स्टेनकडून भारताच्या युवा वेगवान गोलंदाजाचे कौतुक

मोहित शर्माने घेतल्या सर्वाधिक ३ विकेट्स –

क्लासेनने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. शाहबाज अहमदने २० चेंडूत २२ धावा केल्या, तर समदने १४ चेंडूत २९ धावांच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. सुंदर हा प्रभावशाली खेळाडू म्हणून आला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. गुजरातकडून मोहितने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या तर उमरझाई, उमेश, रशीद आणि नूर यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader