Mohammed Shami Ravi Shastri: गेल्या हंगामाप्रमाणेच या वेळीही गतविजेता गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाने १५मे च्या रात्री सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून हे स्थान मिळवले. आयपीएल २०२३मध्ये गुजरात प्ले ऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरला आहे. शुबमन गिलच्या शतकाचा सामना करत हैदराबादची टॉप ऑर्डर मोहम्मद शमीने धारदार गोलंदाजीने उद्ध्वस्त केली. पॉवरप्लेमध्येच संघाने २९ धावांत चार विकेट्स गमावल्या. शमीने १७व्या षटकात धोकादायक हेनरिक क्लासेनला (४४ चेंडूत ६४) बाद करून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे असणारा मोहम्मद शमीचे मजेशीर उत्तर

पर्पल कॅपच्या शर्यतीत पुढे असणाऱ्या अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज शमीने १३ सामन्यात २३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याचा संघातील सहकारी राशिद खानला मागे टाकत चांगल्या इकोनॉमी रेटने विकेट्स घेतल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर रवी शास्त्रींनी मोहम्मद शमीशी संवाद साधला, त्यात त्याने वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी विचारले की या यशाचे रहस्य काय आहे? यावर त्याने मजेशीर असे उत्तर दिले, मोहम्मद शमीची विनोद बुद्धी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

Finance Minister Nirmala Sitharaman wearing a Madhubani saree during Union Budget 2025 presentation
Union Budget 2025: निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेली मधुबनी साडी आणि रामायण यांचा नेमका काय संबंध?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
tushar suryavanshi conversation with padamashri sabarmatee
आपल्याला काय हवे? सकस आहार, की दुर्धर आजार?
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”

हेही वाचा: ICC Revenue Model: BCCI वर्षाला १९ अब्ज कमावणार, यामुळे इतर देशांचा होतोय जळफळाट; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा ICCवर आरोप

रवी शास्त्रींनी मोहम्मद शमीच्या डाएटवर विनोद केला. “तू कोणते जेवण जेवतोस, काय खातोस तू नेमकं? दिवसेंदिवस तू अधिकच मजबूत होत चालला आहे.” असे विचारले. शमीने हा रवी शास्त्रींचा बाऊन्सर हसत-हसत सहन केला आणि शमी म्हणाला, “सध्या गुजरातमध्ये माझे आवडते जेवण मिळत नाही खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहेत.”, असे त्याने मजेशीर उत्तर दिले. नंतर मात्र, कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तो पुढे म्हणाला, “पण मी गुजराती जेवणाचा आस्वाद घेत आहे आणि ते मला फार आवडते.” गोलंदाजाचे हे उत्तर ऐकून रवी शास्त्रीही हसायला लागले.

सामन्यानंतर शमी म्हणाला, “मी माझ्या ताकदीवर लक्ष केंद्रित करून हात घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी नेहमी लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. दिल्लीविरुद्धच्या सामन्याप्रमाणेच चेंडू स्विंग होत होता. मधल्या षटकांमध्ये मोहित शर्मासारखा वेगवान गोलंदाज चतुराईने व्हेरिएशनचा वापर करतो त्याची गोलंदाजी पाहून खूप छान वाटले.”

हेही वाचा: IPL 2023: शुबमन गिलच्या शतकावर आशिष नेहरा भडकला, हार्दिकलाही सुनावले; नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

शमी हा बिर्याणी प्रेमी आहे

मोहम्मद शमीला बिर्याणी किती आवडते हे भारतीय क्रिकेटला फॉलो करणाऱ्यांना माहीत आहे. २०१९च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतल्यानंतर रोहित शर्माने याची खिल्ली उडवली होती. एकदा इशांत शर्मानेही एका मुलाखतीत शमीच्या बिर्याणी प्रेमाचा उल्लेख केला होता. इथेही रवी शास्त्री बिर्याणीवरून भाईजानची खिल्ली उडवत होते.

Story img Loader