Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL Match 23: आजचा रविवार क्रिकेट चाहत्यांसाठी खास ठरला. डबल हेडरमधील दोन्ही सामने हे अतिशय रोमांचक झाले. त्यातील दुसरा सामन्यात राजस्थान रॉयल्सने तीन गडी राखून गुजरात टायटन्सवर रोमांचक विजय मिळवला. हेटमायर हा विजयाचा शिल्पकार ठरला. गुजरात टायटन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. राजस्थानला विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते ते राजस्थानने शेवटच्या षटकात ४ चेंडू आणि तीन गडी राखून पार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल २०२३च्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने चार चेंडू राखून सामना जिंकला. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ६० धावा केल्या. आणि शिमरॉन हेटमायर ५६ धावा करून नाबाद राहिला. गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्यानंतर दोन विकेट्स राशिदने घेतल्या तर कर्णधार हार्दिक पांड्या आणि नूरला १-१ विकेट घेत यांना साथ दिली.

धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने गुजरातला विकेट्स काढून दिली. बटलरला त्रिफळाचीत करत त्याने पहिला धक्का दिला. पण कर्णधार संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर आणि शेवटच्या दोन षटकात अश्विनने एक चौकार आणि एक षटकार मारत संघाला परत आणले. शेवटी हेटमायरने सनसनाटी षटकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, गुजरातने दिलेल्या १७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. संघाने तीन षटकांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. दुसऱ्या षटकात एक धाव घेत यशस्वी जैस्वाल बाद झाली. यानंतर तिसऱ्याच षटकात जोस बटलर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. देवदत्त पडिक्कल काही वेळ क्रीजवर राहिला आणि २५ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. रियान पराग पुन्हा एकदा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. संजू सॅमसनने शिमरॉन हेटमायरसोबत पाचव्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ पोहोचण्यास मदत केली. कर्णधार संजू सॅमसन ३२ चेंडूत ६० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संजूने आपल्या खेळीत ६ षटकार आणि ३ चौकार लगावले. ध्रुव जुरेल १८धावा करू शकला. यानंतर अश्विन झंझावाती खेळी खेळताना तीन चेंडूत १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हेटमायरने एका टोकाकडून फलंदाजी सुरू ठेवली आणि अखेरच्या षटकात षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

डेव्हिड मिलरच्या ४६ आणि शुबमन गिलच्या ४५ धावांच्या खेळीनंतरही राजस्थान रॉयल्सने रविवारी इंडियन प्रीमियर लीग टी२०सामन्यात गुजरात टायटन्सला ७ बाद १७७ धावांवर रोखले. मिलरने ३० चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारत सहा धावांवर मिळालेल्या लाइफलाइनचा फायदा घेतला. गिलने ३४ चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार मारण्याव्यतिरिक्त कर्णधार हार्दिक पांड्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ३३ चेंडूत ५९ धावांची भागीदारी केली. पांड्याने १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २८ धावा केल्या.

हेही वाचा: IPL 2023, GTvsRR Score: हार्दिक ब्रिगेडची संथ फलंदाजी! गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी ठेवले १७८ धावांचे आव्हान

अखेरच्या षटकात अभिनव मनोहरने १३ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २७ धावा ठोकून संघातील आपली निवड सार्थ ठरवली. त्याने मिलरसोबत पाचव्या विकेटसाठी २२ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली. संघाने शेवटच्या चार षटकात ५२ धावा जोडल्या. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध महेंद्रसिंग धोनीसमोर अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या संदीप शर्माने चार षटकांत २५ धावा देत दोन बळी घेत पुन्हा एकदा प्रभावित केले. ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम झाम्पा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gtvsrr score rajasthan royals beat gujarat titans by three wickets samson and hetmyer hit half centuries avw
Show comments