Gujarat Titans (गुजरात टायटन्स)

गतवेळच्या चॅम्पियन गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) यावेळीही तगडा संघ तयार केला आहे. या लिलावात गुजरात टायटन्सने १४.८ कोटी रुपये खर्च करून सात खेळाडूंना खरेदी केले. गुजरातच्या पर्समध्ये ४.४५ कोटी रुपये शिल्लक होते. गुजरात टायटन्स संघ लिलावात सलामीवीर आणि वेगवान गोलंदाजाच्या शोधात होता.

शिवम मावी आणि केन विल्यमसन यांना विकत घेऊन गुजरात टायटन्सने हा शोध पूर्ण केला. हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलरसारखे चांगले फिनिशर असलेल्या गुजरातच्या डावाची सुरूवात मॅथ्यू वेड व शुबमन गिल करू शकतात. वृद्धीमान साहा व मॅथ्यू वेड हे दोघे विकेट किपर असून कदाचित ओपनिंगला उपयुक्त म्हणून वेडला संधी दिली जाऊ शकते. मधल्या फळीत फारसे पर्याय नसलेला गुजरातचा संघ अभिनव मनोहर व विजय शंकरचा पर्याय वापरू शकतात. गरज पडेल तेव्हा स्फोटक फलंदाजी करणारा राहुल तेवतिया गुजरातसाठी हुकमाचा एक्का ठरू शकतो. गोलंदाजीमध्ये गुजरातची मदार राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन व प्रदीप सांगवानवर असेल.

Gujarat Titans (गुजरात टायटन्स) Stats

Match Played
Matches Won
Matches Lost
Matches Tie

Gujarat Titans (गुजरात टायटन्स) Fixtures

Gujarat Titans (गुजरात टायटन्स) Squad