गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये अटीतटीची लढत झाली. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मागील काही सामन्यांपासून फॉमर्मध्ये असलेला राहुल तेवतिया साई सुदर्शनवर चांगलाच रागावला. भर मैदानात राहुलने त्रागा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं ? “१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण

डेविड मिलर झेलबाज झाल्यानंतर गुजरात संघाची ६७ धावांवर चार गडी बाद अशी स्थिती झाली. मिलर तंबुत परतल्यानंतर राहुल तेवतिया फलंदाजीसाठी आला. मागील काही सामन्यांमध्ये त्याने धडाकेबाज फलंदाजी केलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही मोठे फटके मारत गुजरातचा धावफलक फिरता ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याने चेंडू हळुवार पद्धतीने टोलवत चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात असल्यामुळे नॉन स्ट्राईकवरील साई सुदर्शनने धाव घेण्यास नकार दिला. याच कारणामुळे राहुल तेवतिया भडकला. त्याने मैदानातच सुदर्शनला सुनावले. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

हेही वाचा >>> प्रसिध कृष्णाकडून मोठी चूक, ट्रेंट बोल्ट झाला असता गंभीर जखमी, पाहा KKR vs RR सामन्यात काय घडलं?

दरम्यान, गुजरात टायटन्सला आजच्या सामन्यात १५० धावसंख्यादेखील गाठता आली नाही. वीस षटकात गुजरातने १४३ धावा केल्या. साई सुदर्शन वगळता गुजरातचा एकही खेळाडू चांगली कामगिरी करु शकला नाही. साई सुदर्शनने ५० चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. तर फलंदाजीसाठी आलेल्या वृद्धीमान साहाने २१ धावा केल्या. हे दोन फलंदाज वगळता गुजरातचे अन्य फलंदाज आपली जादू दाखवू शकले नाहीत.