Kolkata Knight Riders vs Gujarat Titans Score Updates: कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गतविजेत्या गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नियमित कर्णधार हार्दिक पांड्याच्या जागी राशीद खान नाणेफेकसाठी बाहेर आला, तेव्हा जीटी चाहत्यांना मोठा धक्का बसला. हार्दिकची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे तो केकेआरविरुद्धचा सामना खेळत नाहीये.
गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल झाला आहे. जीटीने हार्दिकच्या जागी अष्टपैलू विजय शंकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले आहे. नाणेफेकीनंतर कार्यवाहक कर्णधार राशीद म्हणाला, “हार्दिक थोडा आजारी आहे आणि संघ त्याच्यासोबत कोणतीही संधी घेऊ इच्छित नाही.” हार्दिकच्या जागी शंकरचा समावेश करण्यात आला आहे.” याशिवाय राशीद म्हणाला, ”खेळपट्टी ताजी दिसत आहे. आशा आहे की आम्ही बोर्डवर चांगली टोटल ठेवू आणि त्याचा बचाव करू. एक संघ म्हणून आम्ही चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू.”
दुसरीकडे, केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. कोलकाताने वेगवान गोलंदाज टीम साऊथी आणि फलंदाज मनदीप सिंगच्या जागी लॉकी फर्ग्युसन आणि एन जगदीशनचा समावेश केला आहे. केकेआरचा कर्णधार नितीश राणा म्हणाला की, “हवामान आणि परिस्थितीमुळे आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. मला वाटले की बचाव करणे सोपे जाईल. दुसऱ्या हाफमध्ये आपल्या फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळावी म्हणून प्रथम फलंदाजी करणे योग्य ठरेल, असे आमच्या मनात होते. पण आता आमच्याकडे आधी गोलंदाजी आहे, त्यामुळे हरकत नाही.”
हेही वाचा – CSK vs MI: धोनी रहाणेला असं काय म्हणाला की त्याने पहिल्याच सामन्यात घातला धुमाकूळ? माहीने सांगितले सिक्रेट
सामन्याबद्दल बोलायचे, तर गुजरात टायटन्स संघाने १३.३ षटकांच्या समाप्तीनंतर तीन बाद ११८ धावा केल्या आहेत. या सामन्यात साहाने १७ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर युवा फलंदाज शुबमन गिलने ३१ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या. तसेच अभिनव मनोहर ८ चेंडूत १४ धावा करुन बाद झाला. केकेआरकडून सुनील नरेनने २ आणि सुयश शर्माने १ विकेट घेतली.