Ashish Nehra’s son Arush mimicked his father’s video went viral: गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रशिक्षक आशिष नेहराचा मुलगा आरुषचा आहे. या व्हिडिओमध्ये आशिष नेहराचा मुलगा वडिलांची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ‘ज्युनियर नेहरा जी’ची फनी स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
‘ज्युनियर नेहरा’ने केली वडिलांची नक्कल –
वास्तविक, गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा सामन्यादरम्यान खूप सक्रिय असतो. तो अनेकदा खेळाडूंशी हातवारे करून किंवा सीमारेषेवर उभे राहून बोलताना दिसून येतो. क्रिकेट चाहते आशिष नेहराला ‘नेहरा जी’ म्हणून हाक मारतात. आता नेहराजींचा मुलगा ‘ज्युनियर नेहरा जी’ याने वडिलांच्या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. ‘ज्युनियर नेहरा जी’ची स्टाइल चाहत्यांना खूप आवडत आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्सने व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहिले की, नेहराची रियल कॉपी… ‘ज्युनियर नेहरा’.
हेही वाचा – ‘ते आमच्यासाठी घरासारखे…’; सॉनेट क्लब कॉलेजमधून बाहेर पडताना पाहून ऋषभ पंतने शेअर केली भावनिक पोस्ट
आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेतील गुजरातच्या स्थानाबद्दल बोलायचे, तर संघ अव्वल स्थानी आहे. गुजरातने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी ६ सामन्यात विजय मिळवला असून २ सामने गमावले आहेत. त्यामुळे या संघाचे १२ गुण आहेत. गुजरात हा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गतविजेता संघ आहे.

गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला –
मात्र, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघात शनिवारी सामना खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकांत ७ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने १७.५ षटकांत ३ गडी राखून लक्ष्य गाठले.या संघाकडून विजय शंकरने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. त्याचवेळी केकेआरसाठी हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.