Gujarat Titans to wear lavender jersey on May 15: आयपीएल २०२३ च्या ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. १५ मे रोजी गुजरातच्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याचा संघ लॅव्हेंडर जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. खरंतर टीम कॅन्सरविरुद्धच्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी हे काम करणार आहे. या आयपीएलमधील हा गुजरातचा घरच्या मैदानावरील शेवटचा सामना असणार आहे. कर्करोगाच्या महत्त्वाच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॅव्हेंडर कलर का निवडला?

भारतासह जगभरात दरवर्षी हजारो लोक कॅन्सरमुळे आपला जीव गमावतात. लॅव्हेंडरची निवड करण्यात आली, कारण हा रंग सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रतीक आहे. हा रंग या प्राणघातक रोगाने प्रभावित झालेल्या अनेक जीवनांची आठवण करून देतो. लॅव्हेंडर जर्सी परिधान करून, गुजरात टायटन्सचे उद्दिष्ट लवकर ओळखणे आणि प्रतिबंध करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आहे. ज्यामध्ये कॅन्सरशी लढण्यासाठी जीवनशैलीतील बदल महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला जातो.

हार्दिक पांड्या काय म्हणाला?

या उपक्रमाद्वारे, गुजरात टायटन्स लोकांना कॅन्सर प्रतिबंधाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि लवकर ओळखण्यासाठी नियमित तपासण्यांसह आवश्यक जीवनशैलीत बदल करण्यास प्रेरित करण्याची आशा करते. ज्यामुळे रोग विकसित होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, “कर्करोग ही भारतातील आणि जगभरातील लाखो लोकांनी लढलेली लढाई आहे. आम्ही एक संघ म्हणून या प्राणघातक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी समजतो.”

हेही वाचा – IPL 2023: पराभवानंतर गोलंदाजांऐवजी आरसीबीचे प्रशिक्षक फलंदाजांवर भडकले, जाणून घ्या काय आहे कारण?

२०२० मध्ये तब्बल इतक्या लोकांनी गमावले प्राण –

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, “लॅव्हेंडर जर्सी घालणे हा कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी एकता दाखवण्याचा आमचा मार्ग आहे. आम्हाला आशा आहे की आमच्या कृतींमुळे इतरांना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आणि ही लढाई लढणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रेरणा मिळेल.” कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. २०२० मध्ये यामुळे सुमारे ९.९ दशलक्ष मृत्यू झाले. गेल्या दशकात जगभरात कर्करोगाच्या घटनांमध्ये २६ टक्के वाढ झाली आहे, तर कर्करोगाशी संबंधित मृत्यूंमध्ये २१ टक्के वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat titans team will wear lavender jersey on may 15 to raise awareness against cancer vbm