Sunrisers Hyderabad vs Gujrat Titans Score Updates : आयपीएल २०२३ चा ६२ वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. एसआरएचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेला गुजरातचा सलामीवर फलंदाज शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये धमाका केला. गिलने ५७ चेंडूत १०१ धावांची खेळी करत आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने ९ विकेट्स गमावत १८८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर विजयाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची दाणादाण उडाली. पॉवर प्ले मध्येच हैदराबादने ५ विकेट्स गमावले. पंरतु, त्यानंतर हेनरिक क्लासेनने चौफेर फटकेबाजी करत ४४ चेंडूत ६४ धावा कुटल्या. मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून हैदराबादचे ९ विकेट्स घेत १५४ धावांवर रोखलं आणि गुजरातने हा सामना ३४ धावांनी जिंकून आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत हैदराबादच्या चार फलंदाजांना बाद केलं. मोहित शर्मानेही भेदक मारा करून एसआरएचच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि गुजरातला विजयाच्या दिशेनं नेलं. यश दयालला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. शमीने अनमोलप्रीत सिंग (५), राहुल त्रिपाठी (१) कर्णधार एडन मार्करमला (१०) आणि हेनरिक क्लासेनला ६८ धावांवर बाद केलं. तर मोहित शर्माने सनवीर सिंग (७), अब्दुल समद (४) ,जेनसनला (३) आणि भुवनेश्वर कुमारला २७ धावांवर बाद केलं.

आंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिनही फॉर्मेटमध्ये शतकी खेळी करणाऱ्या गिलने यंदाच्या आयपीएल हंगामात धमाका केला. गिलने सनरायझर्स विरोधात होत असलेल्या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौफेर फटकेबाजी केली आणि आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. शुबमन गिलने ५६ चेंडूत १०० धावांची खेळी करत शतक ठोकलं. गिलने या इनिंगमध्ये १३ चौकार आणि १ षटकार ठोकला.

गिलने ५७ चेंडूत १०१ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने गिलला बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. या संपूर्ण इनिंगमध्ये भूवनेश्वर कुमारने ५ विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. साई सुदर्शनने ३६ चेंडूत ४७ धावांची खेळी साकारली. जेनसेन, फारूकी आणि नटराजनने हैदराबादसाठी प्रत्येकी एक विकेट घेतली. भुवनेश्वरच्या भेदक माऱ्यामुळं गुजरातला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नाही.