सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. कोणता संघ कधी सामना फिरवेल हे सांगणे कठीण झाले आहे. एकीकडे नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनीदेखील चांगली खेळी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत कोण धडक मारणार याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. तर दुसरीकडे २०२० मध्ये श्रेयस अय्यर दिल्लीचा कर्णधार होता. त्यानं दिल्लीच्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं, असे मत मोहम्मद कैफने मांडताच हरभजन सिंगने श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामामधील सामन्यांवर बोलण्यासाठी आलेल्या हरभजन सिंगने विजयाचे श्रेय पूर्ण संघाला जाते असे म्हटले आहे. चॅटशोमध्ये माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने २०२० मध्ये श्रेयस अय्यर दिल्लीचा कर्णधार होता. त्यानं दिल्लीच्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलं, असे मत मांडले. मात्र कैफच्या या मतानंतर हरभजन सिंगने श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सन २०११ मधील विश्वचषकाच्या विजयाची आठवण काढत त्याने सगळे धोनीने वर्ल्ड कप जिंकला असे म्हणतात. मग बाकीचे दहा खेळाडू काय लस्सी पित होते का ? असं वक्तव्य केलंय. हरभजन सिंग सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांवर मत मत मांडण्यासाठी एका कार्यक्रमात बोलत होता. यावेळी त्याने वरील वक्तव्य केले.
हेही वाचा >> Video : माहीचा कूल अंदाज ! दोन कॅच सोडणाऱ्या मुकेश चौधरीला दिला दिलासा, खांद्यावर हात ठेवून…
हरभजनसिंग काय म्हणाला ?
“जेव्हा ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकतो तेव्हा ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला अशा बातम्या दिल्या जातात. मात्र भारताने विश्वचषक जिंकल्यावर मात्र धोनीने विश्वचषक जिंकला असं म्हटलं जातं. मग बाकीचे दहा खेळाडू काय लस्सी पिण्यासाठी गेले होते का ? गौतम गंभीरने काय केलं होतं ?” असं हरभजनने म्हटलंय.तसेच पुढे बोलताना क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. संघातील सात ते आठ खेळाडू जेव्हा चांगल्या पद्धतीने खेळतात तेव्हाच संघ पुढे जाऊ शकतो, असेदेखील हरभजन सिंग म्हणाला.
हेही वाचा >> IPL 2022, CSK vs RCB : गोव्याच्या प्रभुदेसाईची भन्नाट फिल्डिंग, मोईन अलीला ‘असं’ केलं बाद
दरम्यान, भारताने २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकला होता. यावेळी भारताच्या संघात हरभजनसिंगही सहभाही होता. त्यावेळी भारताने सहा गडी राखून श्रीलंकेवर मात केली होती. तर या सामन्यात धोनीने ९१ धावा केल्या होता. गौतम गंभीरने ९७ धावा केल्या होत्या. भारताने सहा गडी राखून २७५ धावांचे लक्ष्य गाठले होते.