आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. सर्वात प्रथम चेन्नईच्या संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली. यानंतर संघातील महत्वाचा फलंदाज सुरेश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली. यानंतर फिरीकपटू हरभजन सिंहदेखील तेराव्या हंगामातून माघार घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हरभजन सिंह अद्याप युएईत दाखल झालेला नाहीये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना संघातील महत्वाच्या सूत्रांनी हरभजनबद्दल माहिती दिली. “यंदाच्या हंगामात तो खेळणार आहे की नाही हे त्याने अद्याप आम्हाला कळवलेलं नाही. त्यामुळे आम्ही त्याच्याशिवाय तयारीला सुरुवात केली आहे. गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत त्याचं उत्तर येणं अपेक्षित आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही टीम मॅनेजमेंटला हरभजन संघात नसेल असं धरुन रणनिती आखायला सांगितलेलं आहे.” काही दिवसांपूर्वी सुरेश रैनानेही स्पर्धेतून माघार घेतली होती.

अवश्य वाचा –  IPL 2020 : मुंबई विरुद्ध चेन्नईमध्येच रंगणार सलामीचा सामना, सूत्रांची माहिती

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून शुक्रवारपासून चेन्नईचा संघ सरावाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आगामी काळात हरभजन सिंह आयपीएलसाठी संघात दाखल होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा –  IPL 2020 : रैना माझ्या मुलासारखा, पण…; पुनरागमनाबद्दल श्रीनीवासन यांचं महत्वाचं विधान

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh likely to miss ipl 2020 psd