Hardik Pandya banned from 1st match of IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा आयपीएलमधील त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याला आता आयपीएलच्या एका सामन्यासाठी बीसीसीआयच्या बंदीला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वास्तविक, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. या हंगामातील शेवटच्या सामन्यातील चुकीची शिक्षा त्याला पुढील हंगामातील पहिल्या सामन्यात भोगावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने या मोसमात आपले सर्व लीग स्टेज सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत हार्दिक पंड्या पुढील हंगामातील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्याला त्या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. खरे तर हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने या हंगामात दोन सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटचे नियम आधीच मोडले आहेत. अशा परिस्थितीत संघाच्या कर्णधाराने तिसऱ्यांदा असे केल्यास त्याच्यावर बंदी घालण्यात येते.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईची खराब कामगिरी –

आयपीएल २०२४ साठी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार नियुक्त केले होते. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले. या हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. हार्दिक पंड्याने या हंगामापर्यंत कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली होती, परंतु २०२४ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ १४ पैकी केवळ चार सामने जिंकू शकला आणि गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर लखन सुपर जायंट्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही १८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा – Mumbai Indians : मार्क बाऊचरने भविष्याबद्दल विचारताच रोहित शर्माने दिले एका शब्दात उत्तर; म्हणाला…

कसा झाला सामना?

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने १८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकांचा खेळ संपल्यानंतर ६ गडी गमावून २१४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला २० षटकांत १९६ धावांपर्यंत मजल मारता आली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya banned from 1st match of ipl 2025 for maintaining slow over rate against lucknow super giants vbm
Show comments