मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्यासह संघातील खेळाडूंवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. षटकांची गती न राखल्याबद्दल हार्दिकवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्स संघाला षटकांची गती राखता आली नाही.

हार्दिकच्या मानधनातून २४ लाख रुपये कापून घेण्यात येतील. अन्य खेळाडूंच्या मानधनातून प्रत्येकी ६ लाख रुपये किंवा त्यांच्या मानधनाच्या २५ टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mumbai ED filed supplementary charge sheet against OctaFX and other related entities
ऑक्टाएफएक्स प्रकरण : ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, देशातील व्यवहारांतून ८०० कोटी जमा केल्याचा आरोप
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
Virat Kohli Fined 20 Percent Match Fees and 1 Demerit Point For Sam Konstas Controversy
Virat Kohli Fined: विराट कोहलीवर ICC ने केली कारवाई, सॅम कोन्स्टासबरोबर वाद घालणं पडलं भारी

आयपीएल प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आयपीएल नियमानुसार ठराविक वेळेत षटकं पूर्ण करणं आवश्यक होतं. षटकांची गती राखता न आल्यास संघाला ताकीद देण्यात येते. दुसऱ्यांदा षटकांची गती राखता न आल्यास संघावर कारवाई होते.

मंगळवारी लखनऊ इथल्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या लढतीत लखनऊने मुंबईवर ४ विकेट्सनी विजय मिळवला. या पराभवामुळे मुंबईच्या बाद फेरीच्या शक्यता मावळत चालल्या आहेत. त्यातच ही कारवाई झाल्यामुळे मुंबईच्या ताफ्यात निराशाच पसरण्याची शक्यता आहे. मुंबईने यंदाच्या हंगामात १० लढती खेळल्या असून त्यापैकी ३ मध्येच त्यांना विजय मिळवता आला आहे.

मंगळवारी झालेल्या लढतीत लखनऊने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. संथ खेळपट्टीचा फायदा उठवत लखनऊच्या गोलंदाजांनी मुंबईला १४४ धावांतच रोखलं. मुंबईकडून नेहल वढेराने ४६ तर टीम डेव्हिडने ३५ धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. वाढदिवसाच्या दिवशी रोहित शर्मा ४ धावा करुन तंबूत परतला. मोहसीन खानने त्याला बाद केलं. इशान किशनने ३२ धावांची खेळी केली पण या खेळीदरम्यान तो चाचपडताना दिसला. सूर्यकुमार यादवकडून मुंबईला मोठ्या अपेक्षा होत्या पण मार्कस स्टॉइनसने त्याला माघारी धाडलं. त्याने १० धावा केल्या. युवा तिलक वर्मा या सामन्यात अपयशी ठरला. त्याने ७ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या भोपळाही न फोडता तंबूत परतला. नेहल वेढराने चिवटपणे झुंज देत खेळी केल्याने मुंबईला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. लखनऊकडून मोहसीन खानने २ तर स्टॉइनस, नवीन उल हक, मयंक यादव, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट्स पटकावली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लखनऊला हे लक्ष्य गाठताना संघर्ष करावा लागला. स्टॉइनसने ४५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. कर्णधार के.एल.राहुलने २८ धावा केल्या. स्टॉइनस बाद झाल्यानंतर लखनऊची धावगती मंदावली. पण अनुभवी निकोलस पूरनने नाबाद १८ धावा करत लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Story img Loader