Hardik Pandya Explains Plans For MI vs LSG Last Match: मुंबई इंडियन्स (MI) शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्ध यंदाचा शेवटचा सामना खेळणार आहे. आयपीएल २०२४ हे मुंबई इंडियन्सच्या चमूसाठी सर्वात अयशस्वी वर्ष ठरले होते. आयपीएलच्या प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरण्याचा नकोसा पराक्रम यंदा एमआयने केला. आता फक्त चाहत्यांनी एवढीच अपेक्षा आहे की आजच्या सामन्यात जिंकून निदान मुंबई इंडियन्सने शेवट तरी गोड करायला हवा. याच अपेक्षेतून शुक्रवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर चर्चांना सुरुवात झाली आहे. यंदा मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वात झालेला मोठा बदल हाच अपयशाचे कारण असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे आतापर्यंत जे चाहते रोहित शर्माला कर्णधारपद मिळावे यासाठी हार्दिकला ट्रोल करत होते तेच आता रोहितच्या खेळावर सुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत. हार्दिकवरील रोष अद्यापही कायम आहे हे वेगळं सांगायला नकोच. अशावेळी यंदा झालेल्या चुका व कर्णधार म्हणून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टींविषयी हार्दिक पांड्याने आपले मत व्यक्त केले आहे.

हार्दिकने २०२२ मध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून दिले होते २०२३ मध्ये सुद्धा हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघ उपविजेता ठरला होता. परंतु या हंगामात आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये हार्दिक मुंबईला मात्र केवळ चार विजय मिळवून देऊ शकला. याविषयी अलीकडेच हार्दिकने स्टार स्पोर्ट्सच्या ‘कॅप्टन स्पिक’ सेगमेंटमध्ये आपले मत व्यक्त केले. हार्दिक म्हणतो की. “मला वाटतं की कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याची माझी पद्धत सोपी आहे. हार्दिक पांड्या हा फक्त १० सहकाऱ्यांसह खेळतोय, त्यांची काळजी घेणं, त्यांना आत्मविश्वास देणं, तुम्ही करू शकता हे त्यांना पटवून देणं, त्यांना प्रेमाने वागवणं हा सोपा मंत्र मी फॉलो केला आहे. तरच कदाचित ते बाहेर १०० टक्के कामगिरी करू शकतील आणि मला तेच हवं आहे.”

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य

तर पुढे तो म्हणतो की, “मी बहुधा रिझल्ट ओरिएंटेड (निकालाचा विचार करणारा) माणूस नाही पण मी निश्चितच दृष्टिकोन चांगला असण्याला महत्त्व देतो. मी फक्त हे पाहतो की जो खेळाडू मैदानात उतरलाय त्याचा हेतू व दृष्टिकोन कसा आहे. जर त्यांचा हेतू हा संघाच्या हिताचा असेल तर मला वाटतं त्याचीच संघाला गरज असते व मदत होते.”

Video: हार्दिकने सांगितला कर्णधारपदाचा मंत्र, म्हणाला, “माझ्यासाठी..”

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघातील जवळपास प्रत्येक खेळाडू यंदा आपलं सर्वोत्तम पाऊल पुढे ठेवण्यात अपयशी ठरला. अगदी कर्णधार हार्दिकपासूनच सुरुवात करायची तर १२ डावांमध्ये त्याने १८.१८ च्या सरासरीने केवळ २०० धावा केल्या आहेत. मुंबईच्या १३ पैकी ११ सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी केली ज्यात सुद्धा १०.५८ च्या इकॉनॉमी रेटसह ११ च विकेट्स घेतल्या आहेत. रोहित शर्माने सुद्धा सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये दमदार सुरुवात केली होती व नंतर मात्र हिटमॅनची जादू कमी होताना दिसली, काही वेळा तर एकल धावसंख्या करून भारतीय कर्णधाराला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते.

हे ही वाचा<< “रोहित शर्मा पुढचं IPL मुंबईकडून खेळणार नाही, त्याऐवजी..”, म्हणत वसीम अक्रमने वर्तवलं हिटमॅनचं भविष्य

दुसरीकडे, आजचा मुंबई विरुद्ध लखनौ सामना हा एमआयसाठी ‘मान’ जपण्याचा असेल तर लखनौला अजूनही काही समीकरणे जुळून आल्यास प्ले ऑफ गाठण्याची संधी मिळू शकते. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स अनुक्रमे १९ व १६ गुणांसह टॉपला आहेत. तिसऱ्या व चौथ्या जागेसाठी अजूनही चढाओढ सुरु आहे. सध्या तिसरी जागा हैदराबाद व चौथी चेन्नईकडे आहे

Story img Loader