Hardik Pandya Statement on Mumbai Indians Performance: IPL 2024 मधील मुंबई इंडियन्सची मोहीम निराशाजनक पराभवाने संपली. मुंबईला शुक्रवारी लखनऊ सुपर जायंट्सकडून त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. IPL 2024 च्या ६७व्या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ६ बाद २१४ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाला २० षटकांत ६ बाद १९६ धावा करता आल्या. या पराभवानंतर हार्दिक पंड्याने केलेल वक्तव्य चर्चेत आहे.

लखनऊविरूद्धच्या सामन्यात झालेल्या चुकांकडे लक्ष वेधण्याऐवजी हार्दिक पंड्याने संपूर्ण मोसमात आपल्या संघाकडून झालेल्या चुकांचा पाढा वाचायला सुरूवात केली. तो म्हणाला की मुंबई इंडियन्सने संपूर्ण हंगामात दर्जेदार क्रिकेट खेळले नाही, त्याचे परिणाम सर्वांना दिसत आहेत, असे म्हणत संघावरच खापर फोडले. हार्दिक पांड्याने पुढील मोसमात आपला संघ दमदार पुनरागमन करेल, असा आशावाद व्यक्त केला.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

पराभवानंतर बोलताना पंड्या म्हणाला, “हा पराभव पचवणं कठीण आहे. या मोसमात आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळलो नाही आणि त्याचे परिणाम आम्ही संपूर्ण मोसमात भोगले. हे व्यावसायिक जग आहे. इथे कधी चांगले दिवस येतात तर कधी वाईट. एक संघ म्हणून आम्ही दर्जेदार आणि स्मार्ट क्रिकेट खेळलो नाही आणि त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. सामन्यात नेमकं काय चूक झाली हे आताच सांगणं घाई होईल. पुढच्या मोसमात जोरदार पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करू.”

हेही वाचा – IPL 2024: रोहित शर्मा MI साठी खेळला अखेरचा सामना? बाद झाल्यानंतर वानखेडेवर प्रेक्षकांनी केलं अनोख अभिवादन, VIDEO

शुक्रवारी मुंबई वि लखनऊच्या सामन्यात निकोलस पूरन (२९ चेंडूत ७५ धावा) आणि कर्णधार केएल राहुल (४१ चेंडूत ५५) यांची अर्धशतकी खेळी आणि त्यांच्यातील ४४ चेंडूत १०९ धावांच्या भागीदारीच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सच्या विजयाचा पाया रचला. लखनऊने दिलेल्या २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने ३८ चेंडूत ६८ धावा आणि नमन धीर २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकांच्या मुंबईने १९६ धावा केल्या. पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत अशारितीने मुंबईने पराभवानेच आपल्या मोहिमेची सांगता केली.

हेही वाचा – IPL 2024: “सासऱ्यांसोबत शर्माजींच्या मुलाला…”, मुंबईच्या पराभवानंतर केएल राहुलने रोहित आणि सुनील शेट्टीची घेतली फिरकी

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सच्या आयपीएल इतिहासात मुंबईला एका हंगामात १० पराभवांना सामोरे जावे लागण्याची ही दुसरी वेळ आहे. २०२२ मध्येही मुंबईने दहा सामने गमावले होते. सोबतच यंदाच्या मोसमात मुंबईने गुणतालिकेत तळाचे स्थान पटकावले आहे.

Story img Loader