Hardik Pandya’s flight Video: आयपीएल २०२३ मधील साखळी सामन्यांची फेरी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे संघांमध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. अशा या स्पर्धेत एकमात्र सर्वांत जास्त निवांत आहे तो म्हणजे गुजरात टायटन्स. या संघाने मागील वर्षीप्रमाणे यंदाही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सर्वात प्रथम प्लेऑफचे तिकीट पटकावून टॉप २ मध्ये स्थान निश्चित केले आहे. अशात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिकचा स्वॅग पाहायला मिळत आहे.

गेल्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सची कामगिरी या आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट राहिली आणि गुणतालिकेत ते अव्वल स्थानावर आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने सुरुवातीपासूनच शानदार खेळ दाखवला, ज्यामुळे हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. साखळी फेरीत त्यांना अजून एक सामना खेळायचा आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

दरम्यान, गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हार्दिकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते फ्लाइटमध्ये दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला फक्त धूर दिसत आहे. पण त्यानंतर धुराच्या मधूनच हार्दिक स्वॅगमध्ये येताना दिसत आहे. मग तो कॅमेरा जवळ येतो आणि ‘आवा दे’ म्हणतो. हा व्हिडीओ शेअर करत गुजरातने लिहिले, “एन्ट्री असावी तर अशी.”

हार्दिकचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. त्याचे चाहते म्हणत आहेत की, असे काही आहे जे हार्दिक करू शकत नाही. त्याचवेळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, हार्दिकने आता बॉलिवूडमध्येही आपले करिअर करावे. या पोस्टवर चाहते हार्दिकची तुलना दिनेश कार्तिकशी करत आहेत.

हेही वाचा – RR vs PBKS: यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये रचला इतिहास; १५ वर्षांनंतर मोडला शॉन मार्शचा ‘हा’ विक्रम

विशेष म्हणजे गुजरात टायटन्ससाठी शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १३ सामन्यात १४६.१९ च्या स्ट्राईक रेटने ५७६ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकी गोलंदाज राशिद खान यांनी गुजरातसाठी दमदार कामगिरी केली आहे. दोघांनी १३ सामन्यात प्रत्येकी २३-२३ बळी घेतले आहेत. शमी आणि राशिद सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Story img Loader