Natasha Stankovic congratulates MS Dhoni Video Viral : एम एस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सनं पराभव केला. त्यामुळे चेन्नईचा संघ आयपीएच्या इतिहासात पाचवेळा जेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्सनंतर दुसरा संघ बनला आहे. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यानेही धोनीला शुभेच्छा दिल्या. पराभव झाल्यानंतरही पांड्या खूप जास्त भावुक झाला नसल्याचं मैदानातील व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं. शेवटच्या दोन चेंडूवर दहा धावा दिल्यानंतरही पांड्याने मोहित शर्माला दिलासा दिला. अशातच पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकनेही धोनीला गळाभेट देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना हार्दिकने धोनीचं कौतुकही केलं.

गतवर्षी आयपीएलच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करणाऱ्या गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने फायनलचा सामना संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. पांड्या म्हणाला, “मी धोनीसाठी खूप आनंदी आहे. त्याच्या नशिबात असंच लिहिलं होतं. जर मला हरायचं असेल, तर धोनीकडून पराभव झाल्यास मला काहीही समस्या नाही. चांगल्या माणसांसोबत चांगल्या गोष्टी घडत असतात आणि धोनी सर्वात चांगल्या व्यक्तींपैकी एक आहे. देव दया करतो. देवाने माझ्यावरही कृपा केली आहे. पण आजची रात्र धोनीची होती.”

नक्की वाचा – चेन्नईने IPL चा किताब जिंकल्यानंतर धोनीच्या कुटुंबियांचे आनंदाश्रू तरळले, पत्नी साक्षी अन् मुलगी झिवा झाली भावुक, ‘तो’ Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत २६ धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेनं २५ चेंडूत ४७ धावांची खेळी साकारली. पण हे दोन्ही फलंदाज नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं १३ चेंडूत २७ धावा केल्या. रहाणेला मोहित शर्माने बाद केल्यानंतर अंबाती रायुडूने १९ धावा केल्या. पण तोही मोहितच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी मैदानात उतरला पण धोनी या सामन्यात शून्यावर बाद झाला. पण रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेनं गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. दुबे २१ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिला. तर जडेजानं १५ धावांची नाबाद खेळी केली.

Story img Loader