Royals Challengers Bangalore vs Punjab Kings Latest Score Updates : मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये आयपीएलचा २७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. विराट-फाफच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारली. पण या इनिंगमध्ये एक जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. पंजाबचा गोलंदाज हरप्रीत बरारने एकाच षटकात आरसीबीच्या दोन फलंदाजांना बाद केलं. बरारने विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला. बरारच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट-फाफच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांची आरसीबीच्या गोलंदाजांनी पुरती दाणादाण केली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाबच्या चार फलंदाजांना बाद करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं. त्यामुळे पंजाबचा आख्खा संघ १५० धावांवर गारद झाला आणि आरसीबीचा या सामन्यात २४ धावांनी विजय झाला.

नक्की वाचा – मुंबई इंडियन्सला मिळाला धाकड फलंदाज, गोलंदाजीनंतर आता फलंदाजीतही दाखवला जलवा, अर्जुन तेंडुलकरचा ‘तो’ Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

सलामीला मैदानात उतरलेला अथर्व तायडे स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद सिराजने ४ धावांवर असताना अथर्वला बाद केलं. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने सावध खेळी करत ३० चेंडूत ४६ धावांची खेळी साकारली. परंतु त्यालाही पार्नेलने क्लीन बोल्ड केलं अन् पंजाबला दुसरा धक्का बसला. मॅथ्यू शॉर्ट आणि लियाम लिविंगस्टनलाही धावांचा सूर गवसला नाही. हरप्रीत सिंग भाटीया आणि सॅम करनही स्वस्तात माघारी परतले. परंतु, पंजाब किंग्जचा विकेटकीपर जितेश शर्माने आक्रमक खेळी केली. आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने ४ विकेट घेतल्या. हसरंगालाही दोन विकेट घेण्यात यश मिळालं. तर पार्नेलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harpreet brar takes 2 wickets in a over virat kohli and glenn maxwell dismissed on harpreet brar bowling watch viral video nss
Show comments