Harry Brook banned from IPL For 2 Years: आयपीएल २०२५ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण यादरम्यान बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलदरम्यान विदेशी खेळाडू अनेकदा सीझन सुरू होण्यापूर्वीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे माघार घेतात. यामुळे संघांचे बरेच नुकसान होते. हे टाळण्यासाठी बीसीसीआयने लिलावापूर्वीच काही नियम ठरवले होते. आता त्याचा परिणामही दिसून येत आहे. बीसीसीआयने आता इंग्लंडच्या हॅरी ब्रुकवर आयपीएलमधून दोन वर्षांची बंदी घातली आहे. यादरम्यान तो आयपीएल लिलावातही सहभागी होऊ शकणार नाही.

यंदाच्या आयपीएलसाठी लिलावासाठी हॅरी ब्रुकने आपलं नाव नोंदवलं होत. यानंतर त्याचे नाव शॉर्टलिस्ट करण्यात आले आणि त्याच्या नावावर बोलीही लावण्यात आली. दिल्ली कॅपिटल्सने त्याला ६.२५ कोटींमध्ये आपल्या संघात घेण्यात यश मिळविले. मात्र आयपीएलचा हंगाम जवळ येताच हॅरी ब्रूकने आपले नाव मागे घेतले. हॅरी ब्रूकने सलग दुसऱ्या वर्षी असा निर्णय घेतला आहे. यावेळी हॅरीने त्याच्या राष्ट्रीय वचनबद्धतेचे कारण देत माघार घेतली आहे. आता हॅरी ब्रूक आणखी दोन वर्षे आयपीएल खेळू शकणार नाही.

इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार बीसीसीआयने याबाबत ईसीबी म्हणजेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, बीसीसीआयने नियमानुसार हॅरी ब्रुकवर बंदी घातली आहे. हॅरी ब्रुकसह याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाला देखील देण्यात आली.

आयपीएलच्या अनेक संघांना खेळाडूंच्या अशा वागण्याचा त्रास सातत्याने होत होता. आयपीएल लिलावासाठी खेळाडू आपली नावं द्यायचे आणि त्यांची निवड झाल्यावर कुठल्या ना कुठल्या कारणाने ते या स्पर्धेतून आपली माघार घेत असत. हे एकदा नाही तर अनेक वेळा घडले आहे. संघांनी आयपीएल २०२५च्या लिलावापूर्वी बीसीसीआयला याची माहिती दिली. यानंतर बीसीसीआयने नवा नियम तयार केला.

नियमामध्ये बीसीसीआयने स्पष्ट केले की हंगामापूर्वी कोणत्याही खेळाडूने जर माघार घेतली त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येईल. गेल्या वर्षी झालेल्या लिलावापूर्वीच सर्व खेळाडूंना याची माहिती देण्यात आली होती. यासह हॅरी ब्रुकने माघार घेताच बीसीसीआयच्या या निर्णयानुसार आयपीएलमधून बंदी घातली जाणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

हॅरी ब्रुकने दिल्ली कॅपिटल्स संघाला २०२४ च्या आयपीएलमध्ये आजीच्या निधनामुळे माघार घेतली होती. तर यंदा २०२५ च्या आयपीएलमध्येही त्याने माघार घेतली. २०२४ मध्येही दिल्ली कॅपिटल्सने त्याला मोठ्या किंमतीत संघात सामील केलं होत. विकत घेतले होते. आता लवकरच हॅरी ब्रूकचा जागी दिल्ली कॅपिटल्स बंदी खेळाडूची घोषणा करेल.

Story img Loader