आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची चांगली कामगिरी सुरू असतानाही मोठा धक्का बसला आहे. केकेआर संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज असलेल्या हर्षित राणावर आयपीएलकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. हर्षित राणावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे तर मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

हर्षित राणाने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा केला आहे. त्याने आपली चूक मान्य केली आणि सामनाधिकाऱ्याचा निर्णयही मान्य केला आहे. लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी, मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. राणाला यापूर्वी देखील आयपीएल आचारसंहितेच्या याच कलमांतर्गत शिक्षा झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या ४७ व्या सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फक्त शिक्षाच करण्यात नाही आली तर त्याच्या एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा- IPL 2024: केकेआरने ईडन गार्डन्सवर नोंदवला ऐतिहासिक विजय, मुंबई इंडियन्सच्या मोठ्या विक्रमाची केली बरोबरी

बीसीसीआयने यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा हर्षित राणाविरुद्ध कारवाई केली आहे. यापूर्वी हर्षित राणाला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या एकूण ६० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. हंगामाच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर हर्षित राणाने फ्लाइंग किस सेलिब्रेशन केले होते.

हर्षित राणाने या मोसमात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ९.७९ च्या इकॉनॉमी रेटने ११ विकेट घेतल्या आहेत. या मोसमात तो कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे.

Story img Loader