Equation for RCB to reach playoffs : आयपीएल २०२४ मधील ५६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने राजस्थान संघाला फारसा फरक पडला नाही. कारण राजस्थान रॉयल्स संघ १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना फक्त एका विजयाची गरज आहे. मात्र राजस्थानच्या या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मोठे नुकसान होऊ शकते. राजस्थानविरुद्धचा सामना जिंकून दिल्लीने १२ गुणांची कमाई केली, जी आरसीबीसाठी धोक्याची घंटा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा दिल्ली कॅपिटल्सचा पराभव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी फायदेशीर ठरू शकला असता, पण तसे झाले नाही. आता इथून कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला आपापले सामने जिंकावे लागतील, ज्यामुळे आरसीबीसाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा होईल.

आरसीबीसाठी प्लेऑफचे समीकरण –

या अव्वल तीन संघांच्या विजयाव्यतिरिक्त, आरसीबीला आशा करावी लागेल की त्याच्या खालचा कोणताही संघ १४ गुणांच्या पुढे जाऊ नये, ज्यात सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे. हैदराबाद, दिल्ली आणि लखनऊ या तीन संघांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. अशा स्थितीत तिन्ही संघांना उर्वरित सामन्यांमध्ये प्रत्येकी १-१ पेक्षा जास्त विजय नोंदवता येऊ नये. हैदराबाद आणि लखनऊला अद्याप प्रत्येकी ३ आणि दिल्लीला २ सामने खेळायचे आहेत.

हेही वाचा – DC vs RR : सामन्यादरम्यान झालेल्या जोरदार वादानंतर संजू सॅमसन आणि पार्थ जिंदालचा न पाहिलेला VIDEO आला समोर

या सर्व समीकरणांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उर्वरित त्यांचे तिन्ही सामने जिंकावे लागतील. आरसीबीने उरलेल्या तीनपैकी एकही सामना गमावला, तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता आरसीबी टॉप चार मध्ये स्थान मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. आरसीबीने या हंगामात आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानी ४ जिंकले आहेत आणि ७ गमावले आहेत. संघ ८ गुणांसह आणि -०.०४९ च्या निव्वळ धावगतीने सातव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How delhi capitals beat rajasthan royals to make it difficult for royal challengers bangalore to reach the playoffs vbm