Rajasthan Royals vs Chennai Super Kings IPL Match Updates : जगातील बेस्ट फिनिशरपैकी एक असेलेला एम एस धोनी शेवटच्या षटकात २० धावा करण्यात अपयशी ठरला. राजस्थानचा गोलंदाज संदीप शर्माने धोनीला शेवटच्या तीन चेंडूवर ७ धावा करु दिल्या नाहीत. मैदानात अशाप्रकारे सामन्याला कलाटणी लागेल, असं कुणालाही वाटलं नसावं. संदीपने स्वत: भावनिक न होता कोणत्याही दबावात गोलंदाजी केली नाही. धोनीसारख्या फलंदाजासमोर तीन चेंडू अचूक लाईनवर फेकून संदीपने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. ज्याप्रकारे संदीपने शेवटच्या षटकाची सुरुवात केली होती, त्यानुसार असं वाटत होतं की, धोनी २१ धावा काढण्यात यशस्वी होईल.
शेवटच्या षटकात काय झालं?
धोनीसमोर गोलंदाजी करण्याचं संदीप शर्मापुढ आव्हान होतं. धोनीच्या फलंदाजीला पाहून कोणताही गोलंदाज दबावात येतो, हे सत्य सर्वांना माहित आहे. पहिला चेंडू संदीपने वाईड फेकल्यावर धोनी या षटकात काही ना काही कमाल करेल, असं चाहत्यांना वाटलं होतं. पण दबाव इतका होता की, संदीपने दुसरा चेंडूही वाईड फेकला. त्यानंतर सीएसकेला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची आवश्यकता होती. चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. संदीप शर्माही दबावात असल्याचं दिसत होतं.
इथे पाहा व्हिडीओ
त्यानंतरच्या चेंडूवर मात्र धाव मिळाली नाही. पण त्यानंतरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर धोनीन सलग दोन षटकार ठोकले. धोनीने आक्रमक फलंदाजी केल्यामुळं सीएसके विजयाच्या दिशेनं वाटचाल करत होती. सामना जिंकण्यासाठी सीएसकेला ३ चेंडूत ७ धावांची आवश्यकता असताना संदीपने सटीक यॉर्कर फेकून ३ चेंडूत फक्त ३ धावा दिल्या आणि राजस्थान रॉयल्सचा विजय झाला.