How RCB Comeback in IPL 2024: आयपीएल २०२४ ची पराभवांनी सुरूवात करणारा आरसीबी सध्या प्लेऑफच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार आहे. सलग सहा सामने गमावल्यानंतर आरसीबीने जोरदार पुनरागमन केले आहे. त्यानंतर आता सलग पाच सामने जिंकत तळाला असलेला आरसीबीचा संघ पाचव्या स्थानावर आहे. आरसीबीने यंदाच्या हंगामात विलक्षण पुनरागमन केले आहे, पण यामागील नेमके कारण काय होते, याचा खुलासा आरसीबीचा स्टार खेळाडू यश दयाल याने केले आहे.

यश दयालने आयपीएलच्या उत्तरार्धात रॉयल चॅलेंजर्सच्या दमदार पुनरागमनाचे श्रेय संघाच्या आक्रमक खेळाला दिले. गेल्या सामन्यात, RCBने रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात २० धावांत तीन विकेट घेणारा यश दयाल सामन्यानंतर संवाद साधताना म्हणाला, “गेल्या काही सामन्यांत संघाची कामगिरी बरीच सुधारली आहे. गेल्या काही सामन्यांत आम्ही आक्रमक खेळ खेळायला सुरुवात केली आहे, असे मला वाटते. ही आमच्यासाठी मोठी सकारात्मक बाजू आहे.”

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Deepak Chahar wants CSK and RR to buy him in IPL 2025 Auction
Deepak Chahar : ‘जर CSK ने खरेदी केले नाही, तर ‘या’ संघाने माझ्यासाठी बोली लावावी…’, IPL 2025 पूर्वी दीपक चहरचे मोठे वक्तव्य
KL Rahul Statement on Lucknow Super Giants Exit Reveals Reason Ahead of IPL 2025 Auction Said I wanted Freedom
KL Rahul: “मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशा संघात…”, केएल राहुलचे लखनौने रिलीज केल्यानंतर मोठं वक्तव्य, संघ सोडण्यामागचं सांगितलं कारण
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

हेही वाचा- IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने सांगितले की, “जेव्हा आरसीबी पराभवाचा सामना करत होता तेव्हाही संघ ड्रेसिंग रूममध्ये एकजूटीने राहत होता. तो म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही सलग सामने हरता, जसे आमच्यासोबत घडले, तेव्हा मनोबल थोडे खालावते. पण आम्ही जे घडतंय ते स्वीकारलं आणि चांगले पुनरागमन केले.” दयाल संघाच्या पुनरागमनाबद्दल सांगताना म्हणाला, “पण आम्ही पराभूत होत असतानाही कोणाकडे बोटं दाखवली नाहीत. आम्ही संपूर्ण सत्रात सकारात्मक राहिलो.”

यशने त्याच्या कामगिरीबद्दल बोलताना, आपल्या खेळाचे श्रेय प्रशिक्षकांना दिले. दिल्लीविरूद्धच्या सामन्यातील त्याच्या कामगिरीबाबत सांगताना यश म्हणाला, “याचे श्रेय आमच्या प्रशिक्षकांना जाते. मी जेव्हा जेव्हा गोलंदाजी करायला सुरुवात करतो तेव्हा माझे लक्ष्य फक्त माझ्यासमोरील फलंदाजला बाद करणे असते जेणेकरून मी काही धावा वाचवू शकेन.

हेही वाचा – ‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल

दिल्लीविरूद्धच्या विजयानंतर आरसीबीला पुढील सामना चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळायचा आहे. या सामन्यात आरसीबीने गणितीय समीकरणानुसार जर चेन्नईचा पराभव केला तर संघ प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करेल.