How to book IPL 2025 Tickets Online: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा सीझन येत्या ५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. २२ मार्च २०२५ ला पहिलाच सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी गतवर्षीचा उपविजेता संघ सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामना खेळेल. तर तिसरा सामना आयपीएलमधील एल क्लासिको म्हणजेच मुंबई इंडियन्स वि. सीएसके यांच्यात होणार आहे. यासह आयपीएलचा हा सीझन पुढे अधिक रोमांचक होत जाईल. या सामन्यांचा थरार लाईव्ह पाहण्यासाठी सामन्यांची तिकिट कुठे आणि कशी बुक करता येईल, जाणून घ्या.

आयपीएलमध्ये ७० साखळी सामने खेळवले जातील आणि त्यानंतर टॉप -४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पहिला क्वालिफायर सामना हैदराबादमध्ये २० मे रोजी तर एलिमिनेटर सामना २१ मे रोजी कोलकातामध्ये होईल. तर अंतिम सामना२५ मे रोजी खेळवला जाईल. यादरम्यान सर्वच संघांनी त्यांचे तिकिट पार्टनर्स जाहीर केले असून प्रत्येक संघांचे सामने कुठून आणि कसे बुक करता येतील जाणून घेऊया.

आयपीएल संघ आणि त्यांचे तिकीट पार्टनर्स

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट

मुंबई इंडियन्स (MI) – बुक माय शो

गुजरात टायटन्स (GT) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) – बुक माय शो

राजस्थान रॉयल्स (RR) – बुक माय शो

पंजाब किंग्ज (PBKS) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट

सनरायझर्स हैदराबाद (SRH) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – बुकमायशो

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) – टिकट जेनी

दिल्ली कॅपिटल्स (DC) – पेटीएम इनसाइडर / झोमॅटो डिस्ट्रिक्ट

आयपीएल २०२५ साठी तिकिट बुक कसं करायचं? (How to book IPL 2025 tickets)

  • आयपीएल २०२५ सामन्याचं तिकिटं बुक करण्याकरता वर उल्लेख केलेल्या तिकीट पार्टनर्सचे अॅप किंवा वेबसाइट वर क्लिक करायचं.
  • त्यानंतर, कोणत्या सामन्याचं तिकिट हवं आहे ते निवडायचं आणि मग सीट श्रेणी निवडावी लागेल, जी किंमतीनुसार विविध भागांमध्ये विभागली आहे.
  • सीट निवडल्यानंतर, पैसे भरण्यासाठी युपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे पेमेंट करावे लागेल.
  • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, बुकिंग तपशीलांसह एक ईमेल किंवा मेसेज पाठवला जाईल.

आयपीएल २०२५ च्या तिकिटांची रक्कम किती? (IPL 2025 ticket prices)

आयपीएलच्या तिकिटांची रक्कम ही सामने आणि ठिकाणांनुसार वेगवेगळी आहे. मुंबई इंडियन्सच्या वानखेडेवरील सामन्याची कमीत कमी तिकीटाची किंमत ९९९ आहे तर केकेआरच्या सामन्यांची तिकिटांची किंमत ९९० पासून सुरू होते. गुवाहाटीमधील राजस्थान रॉयल्सच्या सामन्याच्या तिकिटांची किंमत १५०० पासून सुरू आहे. गुजरात टायटन्स ४९९ रूपये, सनरायझर्स हैदराबाद ७५० रूपये, पंजाब किंग्स १००० रूपये अशा सामन्यांच्या तिकिटांची किंमत आहे. प्लेऑफ आणि फायनल सामन्यांच्या तिकिटांची किंमत वेगळी असेल.

Story img Loader