आज, शनिवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. ज्या युजर्सकडे डिज्नी+ हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन किंवा फ्री अ‍ॅक्सेस नसेल. त्यांना केवळ 5 मिनिटांपर्यंत आयपीएल 2020 लाइव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. डिज्नी+ हॉटस्टारचे वार्षिक शुल्क ३९९ रुपये आहे. पण खालील कंपनीचे रिचार्ज केल्यानंतर मोफत आयपीएल सामने पाहता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात आधी आपण जिओ कंपनीच्या रिचार्जबद्दल जाणून घेऊयात..

401 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. 28 दिवसांच्या वैधतेसह 6 जीबी एक्स्ट्रा डेटाही या प्लॅनमध्ये मिळतो. याशिवाय जिओ नेटवर्क्ससाठी फ्री कॉलिंग तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. महत्वाचं म्हणजे या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

८४ दिवसांच्या ७७७ रुपयांच्या रिचार्जमध्ये १३१ जीबी डेटा मिळतो. शिवाय ३९९ रुपयांचं डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

2,599 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये रोज 2 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे यात 10 जीबी एक्स्ट्रा डेटाही वापरण्यास मिळतो. म्हणजे एकूण 740 जीबी डेटा यामध्ये मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ फ्री कॉलिंग , दररोज 100 फ्री एसएमएस आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12 हजार मिनिटे मिळतात. महत्वाचं म्हणजे या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

याशिवाय जिओच्या आणखी बऱ्याच प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते. त्यामुळे तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल तर रिचार्ज करण्यापूर्वी एक विचार करा…

एरटेलच्या रिचार्जबद्दल जाणून घेऊयात.. ज्यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी मोफत डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन मिळते.

एअरटेलच्या २८ दिवसांच्या ४०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये एक वर्षांसाठी मोफत ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारचे स्बस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला ३० जीबी डेटा मिळतो.

४४८ रुपयांच्या रिचार्जवरही वर्षभरासाठी मोफत डिज्नी+ हॉटस्टारचे स्बस्क्रिप्शन मिळेल. शिवाय २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा मिळेल.

एअरटेलच्या ५९९ रुपयांच्या प्लॅनचा कालावधी ५६ दिवसांचा असून, यात दररोज २ जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळेल. याशिवाय एक वर्षांसाठी मोफत ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारचे स्बस्क्रिप्शन मिळते.

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये देखील मोफत आयपीएल पाहण्यास मिळेल. या प्लॅनचा कालावधी ३६५ दिवस (एक वर्ष) आहे. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग, दररोज १०० एमएमएस आणि वर्षाभरासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत स्बस्क्रिप्शन मिळेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to watch ipl 2020 on disney hotstar vip without subscription nck