When and Where to Watch IPL 2025 Live: आयपीएल २०२५ चा थरार येत्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. २ महिने चालणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेटप्रेमींना एकापेक्षा एक अटीतटीच्या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. आयपीएल २०२५ मधील पहिला सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. पण या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार जाणून घेऊया.

आयपीएल २०२५ पूर्वीच हॉटस्टार आणि जिओ हे लाईव्ह स्ट्रिमिंग अॅपचे विलीनीकरण झाले. त्यामुळे आता जिओ हॉटस्टार नावाचा अॅपवर सर्व सामने लाईव्ह पाहायला मिळत आहेत. साहजिकचं आयपीएलचे सामनेही जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत. जिओ हॉटस्टारने आता आयपीएल सामने फ्री पाहण्यासाठी नवी योजना आखली आहे. तर टीव्ही चॅनेलवर हे सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील.

गेल्या वर्षी म्हणजेच IPL 2024 पर्यंत सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर होत होते, जिथे चाहत्यांना सामने विनामूल्य पाहता येत होते. मात्र, यावेळी Jio Cinema आणि Disney Plus Hotstar यांचे विलीनीकरण झाले आहे. त्यानंतर आता IPL 2025 लाईव्ह पाहण्यासाठी चाहत्यांना पैसे मोजावे लागणार आहेत.

आयपीएल पाहण्याकरता जिओहॉटस्टारचे प्लॅन कसे आहेत?

JioHotstar चा मोबाईल प्लॅन १४९ रुपयांपासून सुरू होतो, जो तीन महिन्यांसाठी असेल. म्हणजेच १४९ रुपयांमध्ये चाहत्यांना संपूर्ण आयपीएलचा आनंद घेता येईल. याशिवाय एक वर्षाचा प्लॅन ४९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर ३ महिन्यांचा सुपर प्लॅन २९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, चाहत्यांना आयपीएल २०२५ पाहण्यासाठी किमान १४९ रुपये मोजावे लागतील.

आयपीएल २०२५ चे सामने फ्री कसे पाहता येणार?

जिओने आयपीएलपूर्वी ‘अनलिमिटेड ऑफर’ लाँच केली आहे. ही ऑफर तीन महिन्यांसाठी 4K क्वालिटीसह टीव्ही/मोबाइलसाठी वापरता येणार आहे. घरासाठी JioFiber किंवा AirFiber कनेक्शनमध्ये ब्रॉडबँड सर्विसेससाठी वेगळा पर्यायही आहे.

जिओच्या अनलिमिटेड ऑफर काय समाविष्ट आहे?

4K मध्ये टीव्ही/मोबाइलवर ९० दिवस मोफत

घरासाठी ५० दिवसांचे मोफत JioFiber/ AirFiber चाचणी कनेक्शन

JioAirFiber मध्ये

१) ८०० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल

२) ११ पेक्षा जास्त OTT ॲप्स

३) अमर्यादित वायफाय

अनलिमिटेड ऑफरचा लाभ कसा घ्यावा?

  • १७ मार्च ते ३१ मार्च २०२५ दरम्यान नवीन जिओ सिम घेऊन किंवा रिचार्ज करून या ऑफरचा फायदा घेता येईल.
  • जिओ सिम कार्ड पूर्वीपासून असणाऱ्यांसाठी: २९९ रूपये किंवा त्यापेक्षा किमतीचं रिचार्ज ज्यामध्ये १.५GB/दिवस किंवा अधिक)
  • नवीन जिओ सिम कार्ड घेणाऱ्यांसाठी २९९ रूपयांमध्ये नवीन सिम कार्ड घेऊन या ऑफरचा फायदा घेता येईल.
  • ज्या ग्राहकांनी १७ मार्चपूर्वी रिचार्ज केले आहे, ते १०० रुपयांच्या ॲड-ऑन पॅकची निवड करू शकतात.
  • Jio Hotstar पॅक २२ मार्च २०२५ पासून (IPL च्या सुरुवातीच्या सामन्याचा दिवस) ९० दिवसांच्या कालावधीसाठी सक्रिय केला जाईल.

Story img Loader