राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड याच्याविषयी कोणतेही अपशब्द मी उच्चारलेले नाहीत, मला त्याच्याबाबत खूप आदर आहे, असे कोलकाता संघाचा कर्णधार गौतम गंभीर याने सांगितले.
कोलकाताचा मनविंदर बिस्ला व राजस्थानचा शेन वॉटसन यांच्यात काही शाब्दिक चकमक झाली, त्यावेळी द्रविड याने पुढे येऊन बिस्ला याला शांत केले. दुसऱ्या बाजूला उभे असलेला फलंदाज गंभीर हा पुढे येऊन द्रविडशी बोलू लागला.
द्रविडने हसतमुखाने त्याला उत्तर दिले. पुढच्या षटकांत गंभीर यष्टिचीत झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे जाताना गंभीरने द्रविडच्या दिशेने काही शब्द उच्चारले. ‘आपण कोणतेही अपशब्द उच्चारले नाही,’ असा खुलासा गंभीरने केला. तो म्हणाला, ‘केवळ राजस्थान नव्हे तर प्रत्येक संघातील खेळाडूंकरिता द्रविड हा सन्मानाचे ठिकाणी आहे.’  

Story img Loader