IPL Opening Match Record CSK vs GT : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आययपीएल २०२३ चा दुसरा क्वालिफायर सामना आज होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ थेट चेन्नई सुपर किंग्जविरोधात फायनलमध्ये खेळेल. जर मुंबईने गुजरातचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला, तर मुंबईकडे आयपीएलचा सहावा किताब त्यांच्या नावावर करण्याची संधी असेल. मात्र, मागील हंगामात विजेता ठरलेल्या गुजरात टायटन्सने मुंबईचा पराभव केल्यावर त्यांना सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याची संधी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत असं झालं नाही

आयपीएल २०२३ चा ओपनिंग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरातने चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव केला होता. जर गुजरात मुंबईला क्वालिफायर २ मध्ये हरवून फायनलमध्ये गेली, तर चेन्नईला गुजरातचा बदला घेण्याबरोबरच पाचव्यांदा आयपीएल किताब जिंकण्याची संधी मिळेल. ओपनिंग सामना खेळणारे दोन्ही संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचल्यास इतिहास घडेल. कारण आजपर्यंतच्या इतिहासात असं कधीच घडलं नाहीय. ओपनिंग सामना खेळणारे दोन्ही संघ फायनलमध्ये आयपीएल सुरु झाल्यापासून आजतागायत पोहोचले नाहीत.

नक्की वाचा – इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : मुंबईचे अंतिम फेरीचे ध्येय!, ‘क्वालिफायर-२’च्या लढतीत आज गुजरात टायटन्सचे आव्हान

जर गुजतार आणि चेन्नईत फायनल सामना झाला, तर आयपीएलच्या इतिहासातील हा एक अनोखा विक्रम नोंदवला जाईल. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात पहिला सामना खेळणारा संघ ५ वेळा (वर्ष २०११,२०१४,२०१५,२०१८ आणि २०२०) मध्ये चॅम्पियन बनला आहे. पहिला सामना जिंकणारा संघ फक्त तीनवेळा (वर्ष २०११,२०१४,२०१८) मध्ये चॅम्पियन बनली. पहिला सामना हरणारा संघ फक्त दोनवेळा (वर्ष,२०१५,२०२०) चॅम्पियन बनली आहे आणि मुंबई इंडियन्सने दोनवेळा हा पराक्रम केला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If ipl 2023 final between gujrat titans and chennai super kings this will be a historical record in ipl opening teams in final nss