Lucknow Super Giants vs Gujarat Titans IPL Match Updates: शनिवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा गुजरात टायटन्सकडून ७ धावांनी पराभव झाला. मोहित शर्माने अखेरच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात मोहित शर्मा आणि मोहम्मद शमीने शेवटच्या २ षटकांमध्ये गोलंदाजी करत सामना उलटवला, तर हार्दिक पांड्याने त्याचा भाऊ कृणाल पांड्यासोबत स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हार्दिकने त्याचा भाऊ कृणालसोबत मजेशीर पद्धतीने स्लेजिंग केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेटमध्ये भावांच्या अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. इरफान पठाण-युसुफ पठाण, स्टीव्ह वॉ-मार्क वॉ, अ‍ॅडी फ्लॉवर-ग्रॅड फ्लॉवर. त्यात भारतीय संघाचे धुरंधर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचाही समावेश आहे. ही भावांची जोडी सध्या आयपीएल २०२३ स्पर्धेत खेळत आहे. मात्र, हे दोघेही भाऊ वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत. हार्दिक गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत आहे, तर कृणाल लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा सदस्य आहे. या संघात आयपीएलचा ३०वा सामना लखनऊमध्ये पार पडला. या पराभवानंतर हार्दिक पांड्या भाऊ कृणालसोबत स्लेजिंग करताना दिसला. दरम्यानचा व्हिडिओही हार्दिकने शेअर केला.

खरे तर असे झाले की, कृणाल सामन्यात प्रथम फलंदाजीला आला. अशा स्थितीत हार्दिकने आपल्या भावाच्या फलंदाजीचा आनंद लुटताना त्याच्याकडे स्तब्ध नजरेने पाहू लागला, परंतु हार्दिकच्या या स्लेजिंगचा कृणाल वर काहीही परिणाम झाला नाही. जिओ सिनेमाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, चाहतेही या व्हिडिओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. तोच सामना संपल्यानंतर हार्दिक आणि कृणाल यांनी एकमेकांच्या टीमचे टी-शर्ट अदलाबदल केले आणि एकमेकांना मिठीही मारली. हा व्हिडीओही हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: सामन्यादरम्यान सचिनने कापला वाढदिवसाचा केक, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे सेलिब्रेशन तुम्ही पाहिलात का?

हे दोघे आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत असतील, पण दोघांमध्ये एकमेकांसाठी प्रेम आणि आदर आधीसारखाच कायम आहे. हार्दिकने दोघांचा हा व्हिडिओ स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हार्दिक आणि कृणाल या व्हिडिओत एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. सामन्यातील या भावांच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर हार्दिकने गुजरातसाठी शानदार फलंदाजी केली. त्याने ५० चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तसेच, कृणालने लखनऊकडून फलंदाजी करताना २३ धावा केल्या. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना ४ षटकात १६ धावा खर्च करत २ विकेट्सही नावावर केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gt vs lsg match hardik pandya and krunal pandya have sledging incident but after match they exchange their jersey avw