दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. २०१९ पासून गेल्या मोसमापर्यंत हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता पण यंदा दिल्लीचा खेळ खूपच खराब झाला. दिल्लीने नवव्या स्थानावर राहून आयपीएल २०२३ संपवली. जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये दिल्लीच्या एका व्यक्तीची गणना होते तेव्हा ही परिस्थिती उद्भवली. रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली या संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये आहेत पण तरीही ते जास्त प्रभावित करू शकले नाहीत. या दोन वर्षांत संघाने चांगली प्रगती केली नाही, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या हंगामात दिल्ली नियमित कर्णधाराशिवाय मैदानात उतरली. ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झाला होता. याच कारणामुळे तो या मोसमात खेळू शकला नाही. त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नरने संघाचे नेतृत्व केले. वॉर्नरची बॅट चालली पण कर्णधारपद अपयशी ठरले. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे वाहन पुन्हा एकदा पंक्चर झाले. डेव्हिड वॉर्नरच्या संघाला १४ सामन्यांत केवळ ५ सामने जिंकता आले आणि गुणतालिकेत ९व्या स्थानावर त्यांचा प्रवास संपला.

आयपीएल २०२३मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या खराब कामगिरीनंतर भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच सुनील गावसकर यांनी डीसीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांच्यावरही निशाणा साधला. त्याने स्पोर्ट्सस्टारच्या स्तंभात लिहिले की पाँटिंगची उपस्थिती असूनही संघात कोणतीही सुधारणा झाली नाही. दिल्ली संघ युवा खेळाडूंना संधी देऊ शकला असता पण त्यांनी तसे केले नाही”, असेही गावसकर म्हणाले.

हेही वाचा: PM Modi In Sydney: सिडनीतील मुत्सद्देगिरीच्या खेळपट्टीवर पंतप्रधान मोदींनी क्रिकेटचा षटकार, शेन वॉर्नच्या आठवणीना दिला उजाळा

दिल्ली कॅपिटल्स कोणी बुडवली?

दिल्ली कॅपिटल्सच्या खराब कामगिरीनंतर चाहते त्याच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. “रिकी पॉंटिंग आणि सौरव गांगुलीसारखे दिग्गज खेळाडू असूनही संघाची ही अवस्था चिंतेची बाब असल्याचे लोकांचे मत आहे. रिकी पॉंटिंग असूनही संघाची कामगिरी खरोखरच चिंतेचे कारण आहे”, असेही सुनील गावसकर यांचे मत आहे. “दिल्ली कॅपिटल्सनेही अक्षर पटेलचा योग्य वापर केला नाही”, असे ते म्हणाले. “याशिवाय काही युवा खेळाडूंवर ते विश्वास दाखवू शकला असता. पॉंटिंग आणि गांगुली यांसारख्या गतिमान कर्णधारांच्या हाताखालीही संघ प्रगती करू शकला नाही”, असे गावसकर म्हणाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ipl 2023 saurav ganguly and ricky ponting made delhi sink in unsuccess sunil gavaskar pointed the same avw