MS Dhoni is the only captain with most wins against seven teams: रोहित शर्माने कर्णधार आणि खेळाडू म्हणून सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असतील, पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचा असा विक्रम आहे, तो अलीकडच्या काळात मोडने तर विसराच पण त्याच्या आसपासही कोणी नाही. एकप्रकारे, कर्णधारपदाच्या बाबतीत, एमएस धोनी हा आयपीएलमधला किंग आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करताच एक मोठा विक्रम रचला.
१९ वेळा आरसीबीचा पराभव केला आहे –
वास्तविक, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, सीएसकेने १५व्यांदा सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासातील हा सातवा संघ आहे, ज्याला धोनीने कर्णधार म्हणून १५ किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. धोनीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीविरुद्ध सर्वाधिक विजय नोंदवले आहेत. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १९ वेळा आरसीबीचा पराभव केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स आहे, ज्यांच्याविरुद्ध धोनीने एकूण १८ विजय मिळवले आहेत.
मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा १५-१५ सामन्यांमध्ये पराभव –
त्याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने १७ वेळा कोलकाता नाईट रायडर्सला नमवले आहे, तर पंजाब किंग्सला म्हणून १६ सामन्यात पराभूत केले आहे. त्याचबरोबर धोनीने मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचा १५-१५ सामन्यांमध्ये पराभव केला आहे. या यादीत धोनीनंतर रोहित शर्माचे नाव नोंदवले गेले आहे. कर्णधार म्हणून त्याने केकेआरविरुद्ध १४ सामने जिंकले आहेत. तथापि, रोहित या बाबतीत धोनीच्या खूप मागे आहे. कारण रोहितने केवळ एका संघाविरुद्ध १४ सामने जिंकले आहेत.
हेही वाचा – VIDEO: हेनरिक क्लासेनवर संतापला जडेजा, विकेट घेतल्यानंतर ‘असा’ काढला राग
सामन्याबद्दल बोलायचे तर, चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३४ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.४ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने ५७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली.
चेन्नईचा या मोसमातील चौथा विजय –
चेन्नईचा या मोसमातील सहा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. संघाने दोन सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनौ सुपरजायंट्ससह त्यांचे समान गुण आहेत, परंतु राजस्थानचा धावगती सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे आणि यामुळे आरआर अव्वल आहे. लखनौ दुसऱ्या तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.