Virat Kohli embarrassing record of scoring most runs in defeat: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विराट कोहली हा पराभव झालेल्या सामन्यांत देखील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आयपीएल. कारण संघाचा पराभव झाला असताना ही विराट कोहलीने जवळपास ५० टक्के धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीच्या पराभवाचा इतिहास जुना आहे.

उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहली २००८ पासून या आयपीएल संघाचा भाग आहे. तो प्रत्येक हंगामात संघासाठी खेळला आहे. अर्धा डझनहून अधिक हंगाम तो संघाचा कर्णधार राहिला आहे, पण आरसीबीला कधीही आयपीएल ट्रॉफी उचलता आलेली नाही. ही नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे, पण आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने पराभव झालेल्या सामन्यात ३१०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सोमवारी लखनऊविरुद्धच्या आणखी एक अर्धशतक व्यर्थ ठरले.

Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli Fined 20 Percent Match Fees and 1 Demerit Point For Sam Konstas Controversy
Virat Kohli Fined: विराट कोहलीवर ICC ने केली कारवाई, सॅम कोन्स्टासबरोबर वाद घालणं पडलं भारी
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ६७८८ धावा केल्या आहेत, परंतु त्यापैकी ३१२२ धावा पराभव झालेल्या सामन्यांत आल्या आहेत. दुसऱ्या कोणत्याही खेळाडूने पराभवात इतक्या धावा केल्या नाहीत. यामध्ये शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर नक्कीच आहे, पण त्याच्या धावांची संख्या २५३८ आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने पराभवात (लॉसिंग कॉजमध्ये) २५०३ धावा केल्या आहेत. या यादीत चौथे नाव आहे, ते निवृत्त झालेल्या रॉबिन उथप्पाचे. त्याने २३३८ आणि रोहित शर्माने २२९६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IPL 2023 RCB vs LSG: लखनऊच्या विजयनानंतर आवेश खानला फटकारलं गेलं तर आरसीबीच्या कर्णधाराला १२ लाखांचा भुर्दंड

सोमवारी झालेल्या लखनऊ आणि बंगळुरु सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात लखनऊने आरसीबीचा एका विकेटने पराभव करत सामना जिंकला. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २ बाद २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने ९ गडी गमावून २१३ धावा केल्या आणि सामना जिंकला.

या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली. विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. दरम्यान लखनकडून मार्क वुड आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader