राजस्थान रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५६व्या सामन्यात चहलने ही कामगिरी केली. त्याने कोलकाताचा कर्णधार नितीश राणाला बाद करून ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. ब्राव्होने १८३ विकेट्स घेतल्या होत्या. आता हा मुकुट राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाने घेतला आहे. या सामन्यात चहलने ४ षटकात २५ धावा देत ४ बळी घेत पर्पल कॅपचा देखील मानकरी ठरला आहे.

ब्राव्होबद्दल बोलायचे झाले तर त्याने १६१ सामन्यात १८३ विकेट घेतल्या. त्याला मागे टाकण्यासाठी चहलने १८ सामने कमी खेळले. त्याने १४३ व्या सामन्यात ही कामगिरी केली. चहल राजस्थानपूर्वी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्यही होता. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त ड्वेन ब्राव्हो मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्सकडूनही खेळला होता. आता सक्रिय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर पीयूष चावला, अमित मिश्रा आणि रविचंद्रन अश्विन त्यांच्या मागे आहेत. मात्र, हे तिन्ही खेळाडू चहलच्या खूप मागे आहेत. यंदाच्या हंगामात चहलला मागे सोडणे कठीण आहे.

Virat Kohli comes now it seems like he can be dismissed without any issues says Aakash Chopra
Virat Kohli : ‘आता असं वाटतं की विराटला कोणत्याही अडचणीशिवाय…’, भारताच्या रनमशीनबद्दल आकाश चोप्राचे मोठे वक्तव्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
Rohit Sharma Statement on India Series Defeat IND vs NZ Said I wasnt at my best with both bat and as a captain
IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?
IND vs NZ Sunil Gavaskar Smashes Plate While Lunch After Seeing Washington Sundar New Ball Against New Zealand Ravi Shastri
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?
Shreyas Iyer not retained for IPL 2025 by KKR
Shreyas Iyer : ‘श्रेयस अय्यर KKR च्या रिटेन्शन लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होता, पण…’, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांचा मोठा खुलासा
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Virat Kohli Broke Sachin Tendulkar World Record of Most Runs After First 600 Innings in International Cricket
Virat Kohli: ४ धावांवर धावबाद झाल्यानंतरही विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

चहलने कोलकात्याच्या फलंदाजांच्या नांग्या ठेचल्या

कोलकाताविरुद्ध चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात २५ धावा देऊन चार विकेट घेतल्या. चहलने व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले. चहलने आयपीएलमध्ये १४३ सामन्यात १८७ विकेट घेतल्या आहेत. चहल गेल्या हंगामात पर्पल कॅपचा विजेताही होता आणि त्याच्या नावावर हॅट्ट्रिकही होती. या हंगामातही त्याची अप्रतिम कामगिरी कायम आहे. सध्यातरी त्याची ही कामगिरी आगामी काळात टीम इंडियात पुनरागमनासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

खेळाडूसामनेविकेट्स
युजवेंद्र चहल१४३१८७
ड्वेन ब्रावो१६११८३
पीयूष चावला१७६१७४
अमित मिश्रा१६०१७२
रविचंद्रन अश्विन१९६१७१

हेही वाचा: KKR vs RR Match Updates: ईडन गार्डनमध्ये यशस्वी जैस्वालचे वादळ! राजस्थान रॉयल्सने कोलकाताचा तब्बल नऊ गडी राखून उडवला धुव्वा

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने २० षटकांत आठ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १३.१ षटकात १ गडी गमावत १५१ धावा करत सामना जिंकला. त्याच्यासाठी यशस्वी जैस्वालने ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांची तुफानी खेळी केली. जसं काही व्हिडिओ गेम सुरु आहे अशी फलंदाजी केली. कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ४८ धावा करत त्याला चांगली साथ दिली, दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. संघाला एकच धक्का बसला तो जोस बटलरच्या रूपाने. दुसऱ्याच षटकात तो खाते न उघडता धावबाद झाला.