Gautam Gambhir Reaction on Fans Chant Kohli- Kohli: लखनऊ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या चर्चेत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात त्याच्यात आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक चकमक झाली. २० मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सने केकेआरचा एका धावेने पराभव करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरला पाहून चाहते कोहली-कोहलीचा घोषणा करताना दिसले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित केली. यादरम्यान गौतम गंभीर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही चाहत्यांनी त्याच्यासमोर ‘कोहली-कोहली’चा नारा सुरू केला. यानंतर माजी भारतीय खेळाडूने त्याच्याकडे बोट दाखवून इशारा देत त्यांना समज दिली.

‘कोहली-कोहली’चा आवाज ऐकून गौतम गंभीरने दिली ही प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गौतम गंभीर मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. तो जात असताना स्टँडमध्ये बसलेले चाहते गंभीरला पाहताच मोठमोठ्याने कोहली-कोहलीचा घोषणा देताना दिसले. विराटचे नाव ऐकून गंभीर संतापला आणि त्याने हाताने इशारा देत चाहत्यांना समज दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, आणि आता तो चर्चेचा विषय बनला आहे.

लखनऊ आणि कोलकाता यांच्यातील रोमहर्षक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा १ धावेने पराभव झाला असला तरी सर्वजण रिंकू सिंगच्या खेळाचे कौतुक करत आहेत. १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या रिंकूने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. रिंकू सिंगने कोलकाताविरुद्ध ३३ चेंडूंत नाबाद ६७ धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. शेवटी रिंकूने चेंडूवर षटकार ठोकला, पण केकेआरला एक धाव कमीच पडली.

हेही वाचा: CSK vs DC: “…तर आयपीएल सुरु असताना मी कर्णधारपद नाकारले असते”, अक्षर पटेलच्या विधानाने दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात खळबळ

आरसीबी आणि लखनऊ पुन्हा एकमेकांविरुद्ध खेळायला उतरू शकतात

लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, तर आरसीबी संघाला गुजरातविरुद्ध सामना खेळायचा आहे. हा सामना आरसीबीने जिंकला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना पुन्हा एकदा गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना आमनेसामने पाहण्याची संधी मिळू शकते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In match of lucknow vs kolkata fans chanted kohli kohli in front of gautam gambhir on which he gave a reaction video viral avw