IPL 2023 score, MI vs GT: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये आहेत. दोघेही हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. गुजरात प्लेऑफ खेळणार हे जवळपास निश्चित असले तरी मुंबईसाठी हा सामना हरल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ विकेट्स गमावत २१८ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक १०३ धावांची खेळी केली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याचे हे पहिलेच आयपीएल शतक आहे. सूर्याशिवाय इशान किशन, विष्णू विनोद आणि रोहित शर्मा यांनीही मुंबईसाठी उपयुक्त खेळी खेळली. गुजरातकडून राशिद खानने ४ आणि मोहित शर्माने १ विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेली गुजरात टायटन्सला इम्पॅक्ट प्लेअर आकाश मधवाल याने लागोपाठ तीन धक्के देत हार्दिक पांड्याच्या संघाला खिंडार पाडले. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यात तीन षटकात २६ धावा देत तीन गडी बाद केले. त्यानंतर गुजरातचा संघ पॉवर प्ले मध्ये फारसे काही करू शकला नाही. २६ धावांच्या स्कोअरवर गुजरातच्या तीन महत्त्वाच्या विकेट पडल्या. ऋद्धिमान साहा आणि कर्णधार हार्दिक पांड्यापाठोपाठ शुबमन गिलही बाद झाला.

हेही वाचा: MI vs GT Score: सूर्या तळपला! ‘मिस्टर ३६०’ गुजरातला एकटाच भिडला, वानखेडेवर IPL मधील पहिल्या शतकाला गवसणी

कोण आहे हा आकाश मधवाल?

मुंबईसाठी निळ्या जर्सीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणारा आकाश मधवाल उत्तराखंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. आयपीएल २०२२ मध्ये सूर्यकुमार यादवला दुखापत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने आकाशला बदली म्हणून त्यांच्या संघात समावेश केला होता. गेल्या मोसमात त्याला पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी. पण त्यानंतर आयपीएल २०२३ च्या मेगा लिलावापूर्वी मुंबईने या वेगवान गोलंदाजाला २० लाखांमध्ये कायम ठेवले होते. आकाशचा जन्म २५ नोव्हेंबर १९९३ रोजी रुरकी येथे झाला होता.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mi vs gt match impact player aakash madhwal became threat for gujarat titans avw