LSG team will play in new jersey: आयपीएल २०२३ चा साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. गुजरात टायटन्स हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. म्हणजे उर्वरित तीन जागांसाठी अन्य चार संघांमध्ये स्पर्धा आहे. लखनऊ सुपर जायंट्स हा त्या चार संघांपैकी एक आहे. लखनऊ संघाने १३ पैकी ७ सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. सध्या संघ १५ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा शेवटचा साखळी सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शनिवार, २० मे रोजी होणार आहे. त्याआधी संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

वास्तविक हा बदल संघाच्या लाईनअप वगैरेमध्ये नसून महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाच्या जर्सीमध्ये केला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. या मैदानावरील हा हंगामातील शेवटचा सामनाही असेल. त्या सामन्यात लखनऊ संघ कोलकात्याच्या फुटबॉल क्लब मोहन बागानला विशेष सन्मान देणार आहे. यानिमित्ताने मोहन बागानच्या जर्सीच्या रंगाच्या जर्सीमध्ये संघ मैदानात उतरणार आहे. या स्पेशल सामन्यासाठी लखनऊ टीमने आपल्या नवीन जर्सीचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे.

nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Loksatta Lokankika started on Sunday with huge response to Nagpur divisional preliminary round
नागपूर विभागीय ‘लोकसत्ता लोकांकिका’ प्राथमिक फेरीची दमदार सुरुवात
no final decision on how many ministerial posts will be distributed to BJP Shiv Sena and NCP print politics news
मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरूच
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा

Virat Kohli: “…म्हणून माझ्यासाठी १८ नंबरची जर्सी खास आहे”; दोन भावनिक आठवणी सांगताना विराटने केला खुलासा, पाहा VIDEO

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यापासून एक विजय दूर –

लखनऊ सुपर जायंट्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून एक विजय दूर आहे. अखेरच्या सामन्यात लखनऊने मुंबई इंडियन्सविरुद्ध ५ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. आता संघाने केकेआरला हरवले तर त्याचे १७ गुण होतील. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल. दुसरीकडे हा सामना संघ हरला तर इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

हेही वाचा – Virat Kohli: “…म्हणून माझ्यासाठी १८ नंबरची जर्सी खास आहे”; दोन भावनिक आठवणी सांगताना विराटने केला खुलासा, पाहा VIDEO

लखनऊ संघासाठी हा मोसम चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. मोसमाच्या मध्यात, संघाचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर गेला होता. मोहसीन खानही सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघासोबत नव्हता. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ सुरुवातीला डळमळला पण नंतर मोहसीनसारखे तारे चमकले आणि मुंबई इंडियन्सचा पराभव करून संघाने महत्त्वपूर्ण विजय मिळवला.

हेही वाचा – RCB vs SRH: आजच्या सामन्यात आरसीबीसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, हैदराबादमध्ये बंगळुरुची कामगिरी राहिलीय खूपच खराब

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चार संघांमध्ये लढत –

गुजरात टायटन्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. आता लढत लखनऊ, आरसीबी, मुंबई आणि चेन्नई यांच्यात आहे. यापैकी कोणत्याही तीन संघांचे आगमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र या संघांनी आपला शेवटचा-अखेरचा सामना गमावला, तर त्यानंतर केकेआर, राजस्थान आणि पंजाब किंग्जसारख्या संघांच्या आशाही जिवंत होतील. सध्या, १६ चा आकडा प्लेऑफ पात्रतेचा अंतिम मानक मानला जात आहे. पण जर आरसीबीने त्यांचे दोन्ही सामने गमावले किंवा एक गमावला तर प्रकरण १४ वर देखील अडकू शकते. या स्थितीत, आरसीबी, राजस्थान, पंजाब आणि केकेआप मधील संघ जो शेवटचा सामना जिंकेल आणि रनरेट चांगला असेल तो १४ गुणांसह प्लेऑफमध्ये जाईल.

Story img Loader