अल्पावधीत ग्लॅमरस ठरलेल्या आयपीएल स्पर्धेवर नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने एक माहितीपट बनवण्याचे ठरवले आहे. या माहितीपटाचे नाव ‘इनसाइड-स्टोरी’ असून या माहितीपटातून आयपीएलच्या अंतर्गत काय चालले आहे, याचा वेध घेण्यात येणार आहे. ‘‘भारताच्या दूरचित्रवाणी इतिहासात पहिल्यांदाच क्रिकेट चाहत्यांच्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आयपीएलमधली अंतर्गत बातमी काय? यावर माहितीपट असेल,’’ असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inside stories show of national geographic in ipl