आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५२ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात पंजाब किंग्जने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी पंजाबला चांगलंच बांधून ठेवलं. तर दुसरीकडे राजस्थानच्या इतर खेळाडूंनीही क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केली. जोस बटलरने तर शिखर धवनचा अनोख्या पद्धतीने झेल टिपला. या झेलची चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा >> रोहित शर्माचा नाद करायचा नाय! गुजरातविरोधात खेळताना केली ‘ही’ अनोखी कामगिरी, मुंबईसाठी…

पंजाब किंग्जने नेणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन या जोडीने मोठे फटके मारुन संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाच्या ४७ धावा झालेल्या असताना अश्विनने या जोडीला तोडण्यात यश मिळवले. त्याने शिखर धवनला झेलबाद केले.

हेही वाचा >> ज्यांनी जास्त बळी घेतले तेच संघ गुणतालिकेत टॉपमध्ये, जाणून घ्या IPL 2022 मधील वेगळं समीकरण

सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शिखर धवनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू थेट हवेत गेला. तर दुसरीकडे मोठी धाव घेत जोस बटरलने एका हाताने झेल टिपला. चेंडू हातातून निसटू नये म्हणून बटलरने उडीदेखील घेतली. त्याच्या या कामगिरीनंतरच राजस्थानला पहिला बळी मिळाला.

हेही वाचा >> बंगळुरु-चेन्नई सामन्यात प्रेमाचा बहर, तरुणीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, तरुणाने काय केलं? पाहा व्हिडीओ

पंजाब किंग्ज संघाचे प्लेइंग इलेव्हन

जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा

हेही वाचा >> Video : पहिल्याच षटकात मुकेश चौधरीने घेतला पंगा, विराट कोहलीला चेंडू लागताच…

राजस्थान रॉयल्स संघाचे प्लेइंग इलेव्हन

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

Story img Loader