‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे नखशिखांत हादरलेल्या राजस्थान रॉयल्सचे शुक्रवारी हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या आयपीएल साखळीमधील अखेरच्या सामन्यात पानीपत झाले. हैदराबादने २३ धावांनी ही लढत जिंकून बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.जेम्स फॉल्कनरने १६ धावांत पाच बळी घेण्याची किमया साधल्यामुळे राजस्थान रॉयल्सने हैदराबाद सनरायजर्सला २० षटकांत ९ बाद १३६ धावांमध्ये रोखले. फॉल्कनरच्या प्रभावी माऱ्यापुढे हैदराबादची प्रारंभी ३ बाद ५ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. मात्र बिपलाब समंतराय याने ४६ चेंडूंत केलेल्या शानदार ५५ (६ चौकार व एक षटकार) धावा व त्याने डॅरेन सॅमी (२३) याच्या साथीने केलेल्या ५६ धावांच्या भागीदारीमुळेच् हैदराबादला आश्वासक धावसंख्या रचता आली. राजस्थानकडून केव्हिन कुपरने सर्वाधिक २६ तर कप्तान राहुल द्रविडने २५ धावा काढल्या. तथापि, डेल स्टेन, करण शर्मा, थिसारा परेरा आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

Story img Loader