पराभव इथले संपत नाही, असे वर्णन पुणे वॉरियर्सच्या संघाचे करता येईल. रॉबिन उथप्पा व अँजेलो मॅथ्युज यांची दमदार फलंदाजी होऊनही पुणे वॉरियर्सला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा ४६ धावांनी पराभव केला. विजयासाठी १५३ धावांचा पाठलाग करताना पुण्याचा १९.३ षटकांत १०६ धावांमध्ये खुर्दा उडाला. पुण्याचा हा १३ सामन्यांमध्ये ११ वा पराभव आहे. कोलकाता संघाचा हा पाचवा विजय आहे.
पुण्यासाठी १५३ धावांचे लक्ष्य फारसे अवघड नव्हते मात्र सुरुवातीपासूनच त्यांच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाचा अभाव दाखविला. उथप्पा व मॅथ्युज यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. उथप्पाने सातत्यपूर्ण खेळाची मालिका पुढे ठेवताना २ चौकारांसह ३१ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर आलेल्या मॅथ्युजने २८ चेंडूंमध्ये चार षटकारांसह ४० धावा करीत संघास विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र नंतर पुण्याचा डाव १०६ धावांमध्ये कोसळला.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर कोलकाता संघाचा कर्णधार गौतम गंभीर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय सार्थ ठरविताना त्याने मनविंदर बिस्ला याच्या साथीने सलामीसाठी ५.२ षटकांत ४५ धावांची भागीदारी केली. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बिस्ला यष्टीचीत झाला आणि ही जोडी फुटली. बिस्लाने दोन चौकारांसह १२ धावा केल्या. त्याच्या जागी आलेला जॅक कॅलिस अपयशी ठरला. कारकीर्दीतील पहिलाच आयपीएलचा सामना खेळणाऱ्या परवेझ रसूलने त्याला दोन धावांवर बाद करत कोलकाता संघाला आणखी एक धक्का दिला. कोलकाता संघाची पडझड एवढय़ावरच थांबली नाही. मोर्न मोर्कल केवळ १५ धावांवर मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. एका बाजूने गंभीरने जबाबदारीने खेळ करीत स्वत:चे अर्धशतक ४३ चेंडूंमध्ये पूर्ण केले. मात्र लगेचच तो मार्शच्या षटकांत बाद झाला. त्याने ४४ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ५० धावा केल्या. आक्रमक फटकेबाजीबाबत ख्यातनाम असलेल्या युसुफ पठाणने निराशा केली. केवळ तीन धावांवर तो भुवनेश्वरकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. एका बाजूने हे गडी बाद होत असतानाच रियान याने १७ व्या षटकांत अँजेलो मॅथ्युजला एक षटकार व दोन चौकारांसह १७ धावा वसूल केल्या. कोलकाताकडून सर्वाधिक धावा मिळवून देणारे हे षटक ठरले. रायनने २१ चेंडूंत ३१ धावा करताना एक षटकार व दोन चौकार अशी फटकेबाजी केली.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १५२ (गौतम गंभीर ५०, रायन टेन डोश्चटे ३१, भुवनेश्वर कुमार ३/२५) विजयी विरुद्ध पुणे वॉरियर्स : १९.३ षटकांत सर्वबाद १०६ (अँजेलो मॅथ्यूज ४०, रॉबिन उथप्पा ३१, लक्ष्मीपती बालाजी ३/१९)
सामनावीर : गौतम गंभीर
पराभवाचे पाढे पंच्चावन !
पराभव इथले संपत नाही, असे वर्णन पुणे वॉरियर्सच्या संघाचे करता येईल. रॉबिन उथप्पा व अँजेलो मॅथ्युज यांची दमदार फलंदाजी होऊनही पुणे वॉरियर्सला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा ४६ धावांनी पराभव केला. विजयासाठी १५३ धावांचा पाठलाग करताना पुण्याचा १९.३ षटकांत १०६ धावांमध्ये खुर्दा उडाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-05-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2013 kolkata knight riders beat pune warriors by 46 run