आयपीएलच्या सहाव्या पर्वात काल झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवाबद्दल बोलताना कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने सामन्यात फलंदाजी खराब झाल्याने आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे म्हटले आहे. “हो, मी कालच्या सामन्यात झालेल्या आमच्या फलंदाजीवर भरपूर नाराज आहे. १४५ धावांचे लक्ष्य गाठणे आमच्यासाठी कठीण नव्हते, स्टेडियमदेखील फलंदाजीला पोषक ठरणारे होते. गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आणि समोरील संघाला १४४ धावांवर रोखले पण फलंदाजी खराब झाल्याने आमचा पराभव झाला ” असे गौतम गंभीर याने सामना झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
काल (सोमवारी) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रॉयल गोलंदाजी करत आयपीएलच्या गतविजेत्या कोलकाता संघाला अवघ्या १२५ धावांत गुंडाळले. खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती आणि मैदानाची आऊटफील्ड देखील जलदगतीची होती परंतु ,आमच्या फलंदाजांनी चुकीचे फटके लगावल्याने ते बाद झाले. असेही गौतम गंभीरने कबूल केले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा