आयपीएलचा तेरावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असला तरीही बीसीसीआयने अद्याप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये वेळापत्रकासंदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. अखेरीस या चर्चांना आता आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. ६ सप्टेंबर रोजी म्हणजेच रविवारी वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलत असताना पटेल यांनी ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९ सप्टेंबरपासून युएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाची स्पर्धा युएईत आयोजित केली आहे. काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपरकिंग्जच्या संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने वेळापत्रकाची घोषणा लांबणीवर टाकली होती. परंतू CSK चे दोन्ही करोनाग्रस्त खेळाडूंचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर आयपीएलच गव्हर्निंग काउन्सिलने रविवारी वेळापत्रक जाहीर करण्याचं ठरवलं आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 chairman brijesh patel says schedule will be released on september 6 psd