कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची वाट पाहत होते तो क्षण अखेरीस जवळ आलेला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होते आहे. अबु धाबीच्या मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजता गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या स्पर्धेचं आयोजन युएईत केलं आहे. स्पर्धेदरम्यान विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून Bio Secure Bubble तयार करण्यात आलेलं आहे. सर्व संघ गेला महिनाभर या स्पर्धेसाठी कसून तयारी करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईच्या संघासाठी गेल्या काही दिवसांचा काळ फारसा चांगला गेला नाही. दोन खेळाडूंना झालेली करोनाची लागण, हरभजन-रैना यांनी घेतलेली माघार यामुळे चेन्नईसमोर आपला संघ नव्याने उभारण्याची वेळ आलेली आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सलाही आपला प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाची उणीव भासणार आहे. यंदा संपूर्ण हंगाम युएईत खेळवला जाणार असल्यामुळे सर्व संघांना विजयाची समान संधी असल्याचं बोललं जातंय. पण सलामीच्या सामन्यात कोणत्या संघाचं पारडं असेल जड?? प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा कोणाला जास्त बसेल फटका?? या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा हा व्हिडीओ…

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 mi vs csk preview who will win first match psd