चेन्नईच्या संघानं कोलकाचा पराभव केल्यामुळे मुंबईचा संघ क्वालिफाय झाला आहे. यंदाच्या हंगामात प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणारा मुंबईचा पहिला संघ आहे. सीएसकेचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई क्वालिफाय झाल्यामुळे आता उर्वरित तीन स्थानासाठी सहा संघामध्ये चुरस सुरु आहे. साखळी फेरीतील फक्त सात सामने बाकी आहेत. या सात सामन्यानंतर तीन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. सहा संघामध्ये आरसीबीचा संघ सर्वात आधी क्वालिफाय होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या सातव्या स्थानावर असलेला राजस्थान संघ क्वालिफाय होण्याची शक्यता सर्वात कमी आहे. पण अद्यापही ते स्पर्धेत आहेत. प्ले ऑफसाठी पात्र होण्यासाठी कोणत्या संघाकडे किती संधी आहे ते पाहूयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबी, Royal Challengers Bangalore:
लागोपाठ दोन सामन्यात पराभव झाल्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला उर्वरित दोन सामन्यापैकी एकामध्ये विजय गरजेचा झाला आहे. दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यास आरसीबीला नेट रेटच्या आधारावर अवलंबून राहावं लागेल. दिल्ली आणि हैदराबाद या दोन संघाबरोबर आरसीबीचे उर्वरित सामने आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास आरसीबी गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये राहिल.

(आणखी वाचा : पराभवनानंतर KKR ची वाट बिकट; तरीही असे होऊ शकतील क्वालिफाय )

दिल्ली, Delhi Capitals :
आरसीबीप्रमाणेच दिल्लीचीही अवस्था आहे. दोन्ही संघाचे गुण सारखेच आहेत. मात्र, दिल्लीचा नेट रन रेट खराब असल्यामुळे तिसऱ्या स्थानावर आहेत. उर्वरित सामने जिंकल्यास गुणतालिकेत दिल्ली पहिल्या दोनमध्ये पोहचेल. दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवल्यास दिल्ली प्ले ऑफसाठी पात्र होईल. जर दिल्लीनं दोन्ही सामने गमावले तर त्यांना इतर संघाच्या जय-पराजयावर प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळेल.

पंजाब, Kings XI Punjab :

कोलकाताच्या पराभवाचा फायदा पंजाब संघाला झाला आहे. पंजाबनं उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील. त्यांना एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यास नेट रन रेटच्या आधारावर प्ले ऑफचं गणित ठरणार आहे. जर पंजाबला उर्वरित दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पंजाबचे १२ सामन्यात १२ गुण आहेत.

(आणखी वाचा : जाणून घ्या : मुंबईनंतर प्ले ऑफमध्ये कोणता संघ कशापद्धतीने होऊ शकतो क्वालिफाय)

कोलकाता, Kolkata Knight Riders:
चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कोलकाता संघाचं प्ले ऑफमधील गणीत खडतर झालं आहे. उर्वरित सामना जिंकून कोलकाता अव्वल चारमध्ये पोहचू शकतो मात्र, त्यांना इतर संघाच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागेल. त्यातच कोलकाताचा नेट रन रेट खराब असल्यामुळे संधी कमी आहे. कोलकाता संघाच्या नावावर सध्या १२ गुण आहेत. त्यांचा फक्त एक सामना बाकी आहे. म्हणजेच कोलकाता संघ जास्तित जास्त १४ गुणांपर्यंत मजल मारु शकतो. अशात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणं कठीण आहे. नेट रन रेटवर निर्णय न होण्यासाठी इतर संघाच्या जय-पराजयावर कोलकाता संघाला आवलंबून राहावं लागेल. पंजाब उर्वरीत दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यास कोलकाताला क्वालिफाय होण्याची जास्त संधी आहे. तसेच राजस्थान आणि हैदराबाद यांना उर्वरित सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळावा. अशा परिस्थितीत कोलकाता संघ गुणतालिकेत १४ गुणासह चौथ्या क्रमांकावर राहिल.

हैदराबाद, Sunrisers Hyderabad :

हैदराबाद संघाचा +0.396 इतका नेट रनरेट आहे. पॉझिटिव्हमध्ये असणारा नेट रनरेट हैदराबादला प्ले ऑफची आशा देत आहे. १२ सामन्यात हैदराबादचे १० गुण आहेत. त्यांना दोन्ही सामन्यात चांगल्या फरकानं विजय मिळवावा लागेल. आणि इतर संघाच्या पराभवावर हैदराबाद प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल. त्यांचे उर्वरित दोन्ही सामने मुंबई आणि आरसीबीबरोबर आहेत.

राजस्थान, Rajasthan Royals:
प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी राजस्थानला उर्वरित दोन्ही सामन्यात मोठ्या फरकानं विजय आवशक आहे. राजस्थानचा नेट रनरेट -०.५०५ इतका आहे. आठ संघात हा सर्वात खराब आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 playoffs qualification scenario explained 6 teams in contention for 3 remaining spots nck