गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. प्ले-ऑफमध्ये मुंबईने पहिल्या सामन्यात दिल्लीचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत आपलं तिकीट पक्क केलं. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह या जोडीने सुरुवातीच्या षटकांमध्ये भेदक मारा करत दिल्लीचे सलामीचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी धाडले. आयपीएलच्या गेल्या हंगामापर्यंत बोल्ट हा दिल्लीच्या संघाचा सदस्य होता. परंतू तेराव्या हंगामाआधी दिल्लीने Player Transfer Window अंतर्गत बोल्टला मुंबईच्या संघात दिलं. बोल्टसारख्या खेळाडूला दिल्लीने मुंबईच्या संघात देणं ही रणनिती खरंच न समजण्यासारखी होती. ही त्यांची यंदाची सर्वात मोठी चूक ठरल्याचं मत SRH चे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – कपिल देव परवडले, पण जसप्रीत बुमराहचा सामना?? नको रे बाबा…

“मला दिल्लीची ही रणनिती खरंच समजली नाही. मला या गोष्टीची जाणीव आहे की बोल्टला मुंबईकडे देताना यंदाची स्पर्धा युएईत होणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. पण यंदाची स्पर्धा भारतात असती तरीही मुंबईत बोल्ट हा इतर संघांसाठी धोकादायक ठरु शकला असता. मुंबईच्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होतो आणि बोल्ट त्याच्यात माहीर आहे. बोल्ट हा पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम गोलंदाज आहे, त्यामुळे अशा एका गोलंदाजाला स्पर्धेतील सर्वोत्तम संघाला देणं म्हणजे आपला हुकुमाचा एक्का दुसऱ्याला देण्यासारखं झालं.” टॉम मुडी ESPNCricinfo शी बोलत होते.

अवश्य वाचा – IPL 2020 मध्ये पंचही कमावणार लाखो रुपये, जाणून घ्या किती मिळणार मानधन??

आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये बोल्टने २२ बळी घेतले असून तो पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे. तेराव्या हंगामात बोल्टने अनेकदा पहिल्याच षटकात बळी घेत मुंबईला धडाकेबाज सुरुवात करुन दिली आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही बोल्टकडून मुंबई इंडियन्सला अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अवश्य वाचा – जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम टी-२० गोलंदाज !

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 tom moody lambasts delhi capitals for gifting trent boult to mumbai indians psd