आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून या हंगामाला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. क्रिकेटर कोणातही असो आपली बॅट व इतर सर्व गोष्टींची काळजी घेणं त्याला नेहमी आवडतं. RCB चा कर्णधार विराट कोहलीही याला अपवाद नाहीये. RCB च्या संघाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. कर्णधार विराट कोहलीनेही नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरु केला आहे.
विराटने इन्स्टाग्रामवर आपल्या बॅटची आपण कशी काळजी घेतो हे दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात धोनी हातात करवत घेऊन बॅटमधला अनावश्यक भाग कापताना दिसत आहे.
RCB च्या संघाला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. २१ सप्टेंबरला सनराईजर्स हैदराबादविरुद्ध RCB आपला या हंगामातला पहिला सामना खेळेल. त्यामुळे यंदा विराट कोहलीचा RCB संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.